जालना - तालुक्यातील शेतकऱ्यांच्या नगदी पिकांचे लष्करी अळी, बोंडअळीने प्रचंड नुकसान केले आहे. त्यामुळे कृषी विभागही सजग झाला असून प्रत्यक्ष शेतकऱ्यांच्या शेतावर जाऊन विविध प्रयोग व कीटकनाशके वाटप करण्यात येत आहेत. शेतकऱ्यांनी केलेल्या मागणीची बातमी 4 दिवसांपूर्वीच ईटीव्ही भारतने केली होती.
हेही वाचा - केंद्रीयमंत्री रावसाहेब दानवेंनी वाचला राज्य शासनाने केलेल्या कामांचा पाढा
कृषी विभागाने या अळीचा प्रतिबंध करावा, अशी मागणी शेतकऱ्यांनी केली होती. या वृत्ताची दखल घेऊन गुलाबी बोंडअळी व्यवस्थापनाचा प्रसार व प्रचार करण्यासाठी वरिष्ठ शास्त्रज्ञ डॉ. एस. के. पाटील यांनी तालुक्यातील गोकूळवाडी येथील कृष्णा भंडागे या शेतकऱ्याच्या शेतामध्ये जाऊन बोंडअळीचे नियंत्रण कसे शक्य आहे, याबाबत सविस्तर मार्गदर्शन केले. तसेच यावेळी ट्रायकोग्रामा या कीटकनाशकाचे वाटप करण्यात आले.