जालना - बदनापूर तालुक्यातील कडेगाव या छोट्याशा गावात हिंदू-मुस्लीम कायम सुखाने नांदतात. सध्या मुस्लीम बांधवांचा रमजान हा पवित्र महिना सुरू असून, सोमवारी महत्त्वाचा समजला जाणारा रमजान ईद हा सण साजरा होणार आहे. यंदा कोरोनाच्या पार्श्वभूमीवर सुरू असलेल्या लॉकडाऊनमुळे हातावर पोट असलेल्या मजूर, भूमीहीन, रोजंदारीवर काम करणाऱ्यांवर मोठे संकट उभे राहिले आहे. याचाच फटका कडेगाव येथील भूमीहिन मजूरांना बसला आहे. माजी उपसरपंच गणेश कोल्हे यांनी शनिवारी स्वखर्चातून मुस्लीम बांधवांमधील गरीब कुटुंबीयांना अत्यावश्यक वस्तूंचे वाटप केले.
कडेगावमध्ये रमजान ईद निमित्त गरजू मुस्लीम बांधवांना जीवनावश्यक वस्तूंचे किट वाटप - jalna ramjan eid
यंदा कोरोनाच्या पार्श्वभूमीवर सुरू असलेल्या लॉकडाऊनमुळे हातावर पोट असलेल्या मजूर, भूमीहीन, रोजंदारीवर काम करणाऱ्यांवर मोठे संकट उभे राहिले आहे. याचाच फटका कडेगाव येथील भूमीहीन मजुरांना बसला आहे. माजी उपसरपंच गणेश कोल्हे यांनी शनिवारी स्वखर्चातून मुस्लीम बांधवांमधील गरीब कुटुंबीयांना अत्यावश्यक वस्तूंचे वाटप केले.
कडेगाव येथील काही रोजंदारीवर काम करणारे आणि भूमीहिन असलेल्या मुस्लीम बांधवांमध्ये सण साजरा करण्यासाठी लागणारे साहित्य कसे खरेदी करावे ही विवंचणा होती. मात्र, या गरजवंताच्या मदतीला एक तरुण धावला. या गावाचे माजी उपसरपंच गणेश कोल्हे यांनी शनिवारी स्वखर्चातून अशा कुटुंबीयांना बोलावून अन्न धान्य तसेच सणासाठी लागणारे मेवा मसाल्यांचे वाटप केले. या किटमध्ये गहू, तांदूळ, साखर, खारीक-खोबरे, काजू, बदाम, चारोळी, तेल आणि मिठ पॅकेट आदीचा समावेश होता.
यावेळी गावातील यावेळी संतोष बहुरे, ज्ञानेश्वर चांगुलपये, ज्ञानेश्वर कोल्हे, परमेश्वर कोल्हे, नशिर शाह, इसाक शेख, नजीर शाह, इस्माईल भैय्या शेख, रफिक शेख, इम्रन सय्यद, पठाण अब्दुल सय्यद, फिरोज शेख, इसाक शेख, अकबर शहा, मासूमबी पठाण, सजीया शेख, शफिक शेख, इनुस शेख, बानुबी आतार, चांद शाह, गोरीया पठाण आदींची उपस्थिती होती.