जालनाBoy Died In Jalna: शहरातील उपप्रादेशिक परिवहन कार्यालयाच्या मार्गावर असलेल्या, खदानीमध्ये पोहण्यासाठी गेलेल्या पंधरा वर्षीय मुलाचा बुडून मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना घडली आहे. रविवारची सुट्टी असल्याने तीन मित्र पोहण्यासाठी तलावामध्ये उतरले असता, एक जण पाण्यात बुडाला. दोन मुलांनी आरडा ओरडा केला परंतु बचावासाठी जवळपास कोणीही नसल्याने एका मुलाच्या मृत्यू झाला. वैभव गणेश कावळे (वय 15 वर्षे) रा. मातोश्री नगर, असे मयत मुलाचे नाव आहे.
युवकांच्या मदतीने मृतदेह बाहेर काढला: घटनेची माहिती मिळताच चंदनझीरा पोलीस (Chandanzira Police) घटनास्थळी तत्काळ रवाना झाले. पोलिसांनी अग्निशमन दलास घटनेची माहिती दिली. परंतु अग्निशमन दलाच्या कर्मचाऱ्यांना घटनास्थळी पोहोचण्यास उशीर झाला. तसेच त्यांच्याकडे पाण्यात उतरण्यासाठी बोट नसल्यामुळं कर्मचारी बोट आणण्यासाठी जालना शहरात रवाना झाले. दरम्यान पोलिसांनी घटनास्थळावर उपस्थित असलेल्या काही युवकांच्या मदतीने पाण्यामध्ये उतरून मृतदेह बाहेर काढला.
घटनास्थळी नागरिकांनी केली गर्दी : शेख चांद पाशा, सय्यद जावेद, चंदू पोकळे या स्थानिक युवकांनी मयत मुलास पाण्याबाहेर काढले. घटनेची माहिती वाऱ्यासारखी परिसरात पसरल्याने नागरिकांनी घटनास्थळी एकच गर्दी केली होती. दरम्यान पोलीसांनी घटनास्थळाचा पंचनामा करून मृतदेह शवविच्छेदनासाठी रुग्णालयांमध्ये पाठवण्यात आला. तर पुढील तपास चंदनझीरा पोलीस करीत आहेत.
तलावातबाप- लेक बुडाले : याआधीही अशीच एक घटना घडली होती.जालनाशहरातील मोती तलाव ( Moti Talav In Jalna ) परिसरात पोहण्यासाठी गेलेल्या पाच जणापैकी एका १४ वर्षीय मुलासह बापाचा तलावात बुडून दुर्दैवी मृत्यू ( Father Son Drowned In Pool ) झाला होता. माणिक निर्वंळ व त्यांचा १४ वर्षाचा मुलगा आकाश निर्वंळ आपल्या तीन नातेवाईकासह मोती तलाव परिसरात पोहण्यासाठी आले होते. पोहत असताना आपला मुलगा बुडत असल्याचं पाहून माणिक निर्वंळ यांनी त्याला वाचवण्याचा प्रयत्न केला होता. मात्र, तलावात असलेल्या पाण्याचा अंदाज न आल्याने हे बाप- लेक बुडाले होते. घटनेची माहिती मिळताच चंदणझिरा पोलिसांनी ( Chandanzira Police Jalna ) घटनस्थळी धाव घेऊन अग्निशमन विभागाच्या जवानाच्या मदतीने एक तासाच्या अथक परिश्रमानंतर पाण्यात गळ टाकून या बाप- लेकाचा शोध घेत मृतदेह बाहेर काढला होता. घटनेची माहिती मिळताच परिसरातील नागरिकांनी घटनास्थळी एकच गर्दी केली होती.
हेही वाचा -
- Father Son Drowned In Pool : जालना : पोहण्यास गेलेल्या बाप, लेकाचा तलावात बुडून मृत्यू
- Two Minors Drown In Varhal lake : भिवंडीतील वऱ्हाळ तलावात बुडून दोन अल्पवयीन मुलांचा मृत्यू
- Five children died in Aurangabad : तलावात पोहण्यासाठी गेलेल्या 5 मुलांचा तलावात बुडून मृत्यू