जालना- बदनापूर तालुक्यातील सागरवाडी येथे रविवारी संध्याकाळी अवकाळी पावसाने हजेरी लावली. या पावसामुळे सागरवाडी येथील 20 ते 25 घरावरील पत्रे उडून गेले आहेत. तसेच पिकांचेही मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे.
बदनापुरमध्ये अवकाळी पावसाची हजेरी, 25 घरावरील उडाले पत्रे - Jalana latest news
रविवारी संध्याकाळी शहरात ढगाळ वातावरण होते. रात्री पाऊस येईल, अशी शक्यता व्यक्त होत असतानाच संध्याकाळी 5 वाजता अवकाळी पावसाचे आगमन झाले.
रविवारी संध्याकाळी शहरात ढगाळ वातावरण होते. रात्री पाऊस येईल, अशी शक्यता व्यक्त होत असतानाच संध्याकाळी 5 वाजता अवकाळी पावसाचे आगमन झाले. सलग अर्धातास पाऊस सुरूच होता. अधून-मधून विजाही चमकत होत्या. या पावसामुळे शहरातले वातावरण थंड झाले आहे.
दरम्यान, अवकाळी पावसामुळे झालेल्या पिकांची नुकसान भरपाई मिळावी, अशी मागणी शेतकऱ्यांनी केली आहे. तर नायब तहसीलदार शिंदे आणि तलाठी काकडे यांच्याशी संपर्क साधला असता, त्यांनी पंचनामा करून योग्य ती कार्यवाही करू, असे सांगितले.