महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

जिल्हाधिकारी कार्यालयात मंगल कार्यालयाप्रमाणे गर्दी - jalna collector news

औरंगाबाद विभाग पदवीधर मतदार संघासाठी 1 डिसेंबरला मतदान पार पडले. या मतदानानंतर मतपेट्या जमा करण्यासाठी जिल्हाधिकारी कार्यालयात कर्मचाऱ्यांची लगबग सुरू होती.

जिल्हाधिकारी कार्यालय
जिल्हाधिकारी कार्यालय

By

Published : Dec 2, 2020, 8:59 PM IST

Updated : Dec 2, 2020, 9:05 PM IST

जालना -औरंगाबाद विभाग पदवीधर मतदारसंघासाठी 1 डिसेंबरला मतदान पार पडले. या मतदानानंतर मतपेट्या जमा करण्यासाठी जिल्हाधिकारी कार्यालयात कर्मचाऱ्यांची लगबग सुरू होती.

जिल्हाधिकारी कार्यालयात मंगल कार्यालयाप्रमाणे गर्दी

खासगी बस व चारचाकीचा वापर

मत पेट्यांची ने-आण करण्यासाठी यावेळी सरकारी बसचा वापर न करता खासगी बस आणि चारचाकी वाहनांचा वापर केल्याचे प्रामुख्याने जाणून आले. जिल्हाधिकारी कार्यालयाच्या परिसरात पेट्या घेऊन उतरणारे कर्मचारी वऱ्हाडी मंडळीप्रमाणे दिसत होते. त्यातच जिल्हाधिकारी कार्यालयाच्या आवारात बसलेली अधिकारी मंडळी हे पाहुण्यांचे स्वागत करण्यासाठी बसले आहेत की काय? असाही भास होत होता. संध्याकाळी दहा वाजेच्या सुमारास प्रकाश झोतात ही सगळी लगबग सुरू होती.

पोलीस अधिकारी देखील यावेळी जातीने लक्ष घालत होते. कार्यालयाच्या खालच्या मजल्यावर पेट्या जमा करण्यासाठी सुरक्षा कक्ष तयार करण्यात आला होता. या कक्षाबाहेर पोलिसांचा खडा पहारा होता. परिसरामध्ये कर्मचाऱ्यांच्या साहित्याचे वाटप आणि जमा करण्यासाठी देखील स्वतंत्र व्यवस्था करण्यात आली होती. रात्री दहा वाजेपर्यंत पेट्या जमा करण्याचे काम चालू असल्यामुळे या वाहनांच्या रांगा जिल्हाधिकारी कार्यालयाच्या बाहेर असलेल्या महामार्गावर लागलेला होत्या. रात्रीच्या प्रकाश झोतमध्ये अत्यंत आगळेवेगळे वातावरण इथे दिसत होते.

66 .54 टक्के मतदान

जालना जिल्ह्यातील आठ तालुक्यांमध्ये एकूण सरासरी 66.54 टक्के मतदान झाले. यामध्ये हे जालना 58.65, बदनापूर 64.05, भोकरदन 72.47, जाफराबाद 72.18, अंबड 70.60, मंठा 66.16, परतूर 74.59, घनसावंगी 65.16 टक्के, असे मतदान झालेआहे.

हेही वाचा -जालन्यात थकीत वेतनासाठी समाज कल्याण कार्यालयासमोर सुरक्षा कर्मचाऱ्यांचे उपोषण

हेही वाचा -अवैध वाळू वाहतूक करणाऱ्या एकास अटक, 7 लाख 4 हजारांचा मुद्देमाल जप्त

Last Updated : Dec 2, 2020, 9:05 PM IST

ABOUT THE AUTHOR

...view details