महाराष्ट्र

maharashtra

By

Published : Apr 9, 2020, 10:01 PM IST

ETV Bharat / state

जमावबंदीतही समृद्धी महामार्गाचे काम सुरूच

कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी राज्यात लॉकडाऊन करण्यात आला आहे. या काळात सर्व कामे बंद आहेत. असे असताना बदनापूर तालुक्यातून जाणाऱ्या समृद्धी महामार्गाच्या रस्त्याचे काम मजुरांकडून करून घेतले जात आहे.

construction of samruddhi highway during lockdown
जमावबंदीतही समृद्धी महामार्गाचे काम सुरूच

जालना - कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी राज्यात लॉकडाऊन करण्यात आला आहे. या काळात सर्व कामे बंद आहेत. असे असताना बदनापूर तालुक्यातून जाणाऱ्या समृद्धी महामार्गाच्या रस्त्याचे काम मजुरांकडून करून घेतले जात आहे. या कामात अवैधरित्या उत्खनन करून मुरूमाची वाहतूक केली जात आहे. असे असताना प्रशासन मात्र, बघ्याची भूमिका बजावीत आहे.

जमावबंदीतही समृद्धी महामार्गाचे काम सुरूच

कोरोनाचा फैलाव रोखण्यासाठी शासनाने महाराष्ट्रसह देशात लॉकडाऊन केला आहे. तरी देखील नागरिकांच्या चुकांमुळे राज्यात कोरोना रुग्णांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे. महाराष्ट्र शासनाने सर्व आस्थापना बंद करण्याचे आदेश दिलेले आहेत. याकाळात कोणीही घराबाहेर निघू नये, अशा सूचना देऊन महसूल व पोलीस प्रशासनास कारवाई करण्याचे आदेश निर्गमित करण्यात आले आहेत.त्यामुळे जालना जिल्ह्यात जिल्हादंडाधिकारी रवींद्र बिनवडे यांनी अधिकाराचा वापर करून जमावबंदी आदेश लागू केला आहे. असे असताना देखील तालुक्यात जमावबंदी आदेशाचे उल्लंघन केले जात असल्याचे चित्र दिसत आहे.

जमावबंदीतही समृद्धी महामार्गाचे काम सुरूच


बदनापूर तालुक्यातून समृद्धी महामार्ग जात आहे. सोमठाणा ते अकोला जाणाऱ्या या कामावर परजिल्हा, परराज्यातील मजूर कामावर आहेत. या ठिकाणी समृद्धी महामार्ग रस्त्याचे काम बिनधास्तपणे सुरू असल्याचे दिसून येते. दररोज या कामावर अनेक मजूर काम करत असताना या विभागाचे अभियंता का कानाडोळा करत आहेत हे समजत नाही. सदरील कामाचे ठेकेदाराने हे काम बंद करून या मजुरांना वेतन द्यायला पाहिजे. यासाठी कार्यकारी अभियंता यांनी त्यांना कामबंद करण्याचे आदेश देण्याची गरज आहे. याच ठिकाणी अवैधरित्या टिप्परद्वारे मुरूम वाहतूक ही सुरू असल्याचे दिसून येते.

जमावबंदीतही समृद्धी महामार्गाचे काम सुरूच

कोरोना निवारण्यासाठी पोलीस व महसूल प्रसाशन काम करत असताना, रस्त्यावरून बिनधास्त अवैध उत्खनंन केलेले ट्रक जा ये करताना आढळून येतात. समृद्धी महामार्गाच्या या कामावर मजूर एकत्र येत असल्याने कोरोना रोगाला निमंत्रण मिळण्याची दाट शक्यता निर्माण झाली आहे. त्यामुळे प्रशासनाने हे काम थांबवावे अशी मागणी होत आहे.

जमावबंदीतही समृद्धी महामार्गाचे काम सुरूच

ABOUT THE AUTHOR

...view details