जालना -पेट्रोल आणि डिझेल दरवाढ करून मोदी सरकारने सामान्य जनतेचे 25 लाख कोटी रुपये लुटले आहेत, असा आरोप काँग्रेस पक्षाच्या वतीने आज जालना येथे करण्यात आला.
मोदी सरकारने जनतेचे 25 लाख कोटी रुपये लुटले, काँग्रेसचा आरोप - Congress movement in jalna
पेट्रोल आणि डिझेल दरवाढ करून मोदी सरकारने सामान्य जनतेचे 25 लाख कोटी रुपये लुटले आहेत, असा आरोप काँग्रेस पक्षाच्या वतीने आज जालना येथे करण्यात आला.
काँग्रेसचे आंदोलन
काँग्रेस पक्षाच्यावतीने पेट्रोल आणि डिझेल दरवाढीच्या निषेधार्थ आज जालना शहरातील जंगडे पेट्रोल पंपासमोर आंदोलन करण्यात आले. यावेळी मोदी सरकारच्या विरोधात घोषणाबाजीही करण्यात आली. डिझेल 90 रुपये तर पेट्रोल 100 रुपयांच्या पुढे गेलेले आहे. त्यामुळे सर्वसामान्य जनता त्रस्त झाली आहे. काँग्रेसच्या काळात पन्नास रुपये लिटर मिळणारे पेट्रोल आता शंभर रुपयांच्या पुढे गेल्याने मोदी सरकारने ही भाववाढ करून जनतेचे पंचवीस लाख कोटी रुपये लुटले असल्याचा आरोपही पदाधिकाऱ्यांनी केला. तसेच ही भाववाढ त्वरित मागे न घेतल्यास यापेक्षाही मोठे आंदोलन करण्यात येईल असा इशाराही दिला आहे. या आंदोलनात काँग्रेसचे जिल्हा कार्याध्यक्ष राजेंद्र राख, शहराध्यक्ष शेख महेमूद, प्राध्यापक सत्संग मुंडे, नंदा पवार, विजय कामड, उबाळे आदींची उपस्थिती होती.
हेही वाचा- ईटीव्ही विशेष : बेवारसांचा आधारस्तंभ असलेले समाजसेवक शंकरबाबा पापळकर यांच्याशी खास संवाद...