महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

जालना शहराला आंतरराष्ट्रीय स्तरावर ओळख मिळवून दिली- मुख्यमंत्री - jalna

आंतरराष्ट्रीय शहर म्हणून जालना उदयास येत आहे. एवढी विकासाची कामं या जिल्ह्यात झाली आहेत. येथे येत असलेल्या विविध प्रकल्पांमुळे या शहराला आंतरराष्ट्रीय ख्याती प्राप्त होईल आणि जगातली लोकं शहराकडे आकर्षित होतील, असा विश्वास मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केला.

जालना शहराला आंतरराष्ट्रीय स्तरावर ओळख मिळवून दिली- मुख्यमंत्री

By

Published : Aug 29, 2019, 3:13 AM IST

जालना-आंतरराष्ट्रीय शहर म्हणून जालना उदयास येत आहे. एवढी विकासाची कामं या जिल्ह्यात झाली आहेत. येथे येत असलेल्या विविध प्रकल्पांमुळे या शहराला आंतरराष्ट्रीय ख्याती प्राप्त होईल आणि जगातली लोकं शहराकडे आकर्षित होतील, असा विश्वास मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केला. महाजनादेश यात्रेनिमित्त ते बुधवारी जालन्यात आले होते. यावेळी व्यासपीठावर भाजपचे केंद्रीय कार्याध्यक्ष जेपी नड्डा, राष्ट्रीय महामंत्री भूपेंद्र यादव, खासदार आणि केंद्रीय राज्यमंत्री रावसाहेब दानवे, नामदार बबनराव लोणीकर, आ. नारायण कुचे, आ. संतोष दानवे आदींची उपस्थिती होती.

जालना शहराला आंतरराष्ट्रीय स्तरावर ओळख मिळवून दिली- मुख्यमंत्री
शहराजवळून जाणारा समृद्धी महामार्ग, शहरातील ड्रायपोर्ट, केमिकल कॉलेजसोबतच औरंगाबाद येथील शेन्द्रा आणि बिडकीन येथील स्मार्टसिटीमुळे जालना आता औरंगाबादला जोडल्या गेला आहे. त्यामुळे एक आंतरराष्ट्रीय शहर म्हणून जालन्याची ओळख निर्माण होत आहे. या शहराच्या विकासासाठी लागणारा पैसा आम्ही दिला आहे आणि यापुढेही देत राहू. जालन्याच्या विकासासाठी तिजोरी रिकामी करायचीही माझी तयारी आहे, असे मुख्यमंत्री यावेळी म्हणाले.

परीक्षेत नापास झाल्यावर विद्यार्थी जसे त्याचे खापर पेनावर फोडतो. त्याचप्रमाने विरोधक त्यांच्या पराभवाचे खापर ईव्हीएम मशीनवर फोडत आहेत. मात्र ईव्हीएम म्हणजे "एव्हरी वोट फॉर मोदी" आहे, असेही मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यावेळी म्हणाले.

ABOUT THE AUTHOR

...view details