जालना- 'आज के शिवाजी नरेंद्र मोदी' या पुस्तकाद्वारे पंतप्रधान मोदींची तुलना थेट शिवाजी महाराजांशी केल्यानंतर राज्यभरातून संतप्त प्रतिक्रिया उमटू लागल्या होत्या. त्याचप्रमाणे भोकरदन येथील विविध पक्षाच्या व संघटनेच्या वतीने शहरातील छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्याजवळ गोयल यांचा निषेध व्यक्त करण्यात आला. यावेळी घोषणाबाजी करून भगवान गोयल यांच्या प्रतिमेचे दहन करण्यात आले.
पंतप्रधान नरेंद्र मोदींची शिवाजी महाराजांसोबत तुलना हेही वाचा - सुप्रिया सुळेंनी आवरता घेतला उद्घाटन समारंभ; चिरंजीवाच्या वाढदिवसाला जाण्याची घाई
भारतीय जनता पक्षाच्या दिल्ली कार्यालयात शनिवारी पार पडलेल्या सांस्कृतिक संमेलनात 'आज के शिवाजी नरेंद्र मोदी' या पुस्तकाचे प्रकाशन करण्यात आले होते. या पुस्तकावरून काँग्रेस आणि शिवसेनेनं सडकून टीका केली आहे.
हेही वाचा - उद्योजकांनी व्यवसायामध्ये नावीन्य ठेवावे - डॉ. स्मिता लेले
यावेळी सुरेश तळेकर, महेश पुरोहित, अप्पासाहेब जाधव, विष्णु गाढे ,अब्दुल कदिर बापू आदीसह विविध पक्षाचे व संघटनेचे कार्यकर्ते, नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.