महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

केंद्रीयमंत्री रावसाहेब दानवेंनी वाचला राज्य शासनाने केलेल्या कामांचा पाढा - केंद्रीय मंत्री रावसाहेब दानवे जालना पत्रकार परिषद

राज्य सरकार व केंद्र सरकारने मागील पाच वर्षाच्या काळात केलेल्या विकासकामांची माहिती केंद्रीय मंत्री रावसाहेब दानवे यांनी दिली. यावेळी त्यांनी उत्तर महाराष्ट्र, मराठवाडा व विदर्भासाठी समृद्धी महामार्गाच कसा महत्त्वाचा याचा उल्लेखही केला.

रावसाहेब दानवे

By

Published : Oct 11, 2019, 10:27 AM IST

जालना - केंद्रीय राज्यमंत्री रावसाहेब दानवे यांनी गुरूवारी सरकारने पाच वर्षात केलेल्या विविध विकास कामांचा पाढा वाचला. स्वच्छ भारत अभियान, वीज पुरवठा, राष्ट्रीय ग्रामीण पेयजल कार्यक्रम, मागेल त्याला शेततळे या योजनांची माहिती जालना येथे आयोजित पत्रकार परिषदेत दिली.

केंद्रीयमंत्री रावसाहेब दानवे जालना येथील पत्रकार परिषदेला संबोधताना

हेही वाचा - अंगाला हळद लागण्यापूर्वीच रस्त्यांवरील खड्ड्यांनी घेतला डॉक्टर तरुणीचा बळी

राज्य सरकार व केंद्र सरकारने मागील पाच वर्षाच्या काळात केलेल्या विकासकामांची माहिती दानवे यांनी दिली. यावेळी त्यांनी उत्तर महाराष्ट्र, मराठवाडा व विदर्भासाठी समृद्धी महामार्गच कशा प्रकारे महत्वाचा ठरू शकतो याची माहिती दिली.

दानवे म्हणाले, ७०१ किलोमीटर लांबीचा १२० मीटर रुंदीचा आणि ८३११ हेक्टर जमीन भूसंपादन करून हा रस्ता तयार करण्यात येत आहे. सोबतच मुख्यमंत्री वैद्यकीय सहायता कक्षांमधून राज्यातील ४३० रुग्णालयांमध्ये २० लाख ८३ हजारांपेक्षा अधिक रुग्णांना ९०० कोटी रुपयांची मदत करण्यात आली आहे. तसेच गेल्या पाच वर्षात २ लाख ४५ हजार महिला बचत गट स्थापन करून ग्रामीण भागातील ३२ लाख ८६ हजार कुटुंबांना बचत गट चळवळीशी जोडले जोडले आहे. शैक्षणिक महाराष्ट्र या योजनेअंतर्गत ६६ हजारांहून अधिक शाळा डिजिटल तर ४८ हजार शाळा प्रगत झाल्या आहेत.

या पत्रकार परिषदेला सिद्धिविनायक मुळे, जगन्नाथ पांगारकर, किशोर शेठ अग्रवाल, राजेश राऊत, डॉक्टर श्रीमंत मिसाळ, आदींची उपस्थिती होती.

हेही वाचा - ...तर साताऱ्याला मंत्री पद देऊ - मुख्यमंत्री

ABOUT THE AUTHOR

...view details