महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

जालना रेल्वे स्थानक जूलैअखेर येणार सीसीटीव्हीची निगराणीत

नांदेड विभागाचे विभागीय व्यवस्थापक म्हणून गजानन मल्ल्या यांनी आज पहिल्यांदा जालना जिल्ह्याचा दौरा केला.

जालना रेल्वे स्थानक

By

Published : Mar 16, 2019, 7:07 PM IST

जालना - जुलै महिन्याच्या अखेरपर्यंत जालना रेल्वे स्थानकावर सीसीटीव्ही कॅमेरे बसवण्यात येणार आहेत. याचबरोबर स्थानकासमोरील रिकामी जागा ही पार्किंगसाठी वाढवून देण्यात येईल. रेल्वे सुरक्षा दलामध्ये भरतीची प्रक्रिया सुरू असून वर्षभरात रिक्त असलेली २० टक्के पदे भरून काढण्यात येईल, अशी माहिती रेल्वेचे विभागीय व्यवस्थापक गजानन मल्ल्या यांनी आज दिली.

रेल्वेचे विभागीय व्यवस्थापक गजानन मल्ल्या

नांदेड विभागाचे विभागीय व्यवस्थापक म्हणून गजानन मल्ल्या यांनी आज पहिल्यांदा जालना जिल्ह्याचा दौरा केला. यादरम्यान त्यांनी रेल्वेस्थानकाच्या सुरक्षेची पाहणी केली. येत्या वर्षभरात रेल्वेची भरती पूर्ण होऊन आवश्यक त्या स्थानकांना सुरक्षा पुरवली जाईल. तसेच जालना रेल्वे स्थानकावर सुरक्षेच्या दृष्टीने जुलै महिन्यापर्यंत सीसीटीव्ही कॅमेरे बसवण्याची प्रक्रिया देखील पूर्ण होईल, असे त्यांनी सांगितले. स्थानकाला लागून असलेल्या भुयारी मार्गाचे काम देण्यात आले आहे. ते देखील २ महिन्यांमध्ये सुरू होणार आहे.

दरम्यान रेल्वेस्थानकासमोरील वाहनांच्या पार्किंग विषयी आलेल्या तक्रारींची शहानिशा करत रिक्षाचालकांसाठी दुभाजक वाढून देण्याचे आदेश त्यांनी दिले. दुचाकी पार्किंग आणि बस स्थानकादरम्यान असलेली मोकळी जागा ही पार्किंगसाठी वापरण्याचे आदेशही ही त्यांनी दिले. अंबडरोड कडून रेल्वेस्थानकाकडे येणार्‍या मधल्या रस्त्यामध्ये काळी-पिवळी टॅक्सी चालकांनी अतिक्रमण केले आहे. हा रस्ता देखील बंद करून तिथे भिंत बांधण्यात यावी अशा सूचनाही ही मल्या यांनी दिल्या. रेल्वे प्रवाशांची वाढती गर्दी लक्षात घेऊन रेल्वेचे डबे वाढवण्याची मागणी रेल्वे समितीच्या पदाधिकाऱ्यांनी केली. मात्र सध्याचे डबे वाढवणे शक्य नसल्याचे त्यांनी सांगितले.

ABOUT THE AUTHOR

...view details