महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

Protest in Jalna : तृतीयपंथीयांचे सरकारविरोधात 'गाजर आंदोलन' - third parties against the government

रेशन न मिळाल्यामुळे जालन्यात तृतीय पंथीयांचे ( Protest in Jalna due to non-receipt of ration ) सरकारला गाजर दाखवून आंदोलन. जालना शहरातील तृतीय पंथीयांना त्यांच्या हक्काचे रेशन अद्याप मिळाले नाही.

Protest in Jalna
तृतीयपंथीयांचे सरकार विरोधात गाजर आंदोलन

By

Published : Oct 23, 2022, 4:17 PM IST

जालना -रेशन न मिळाल्यामुळे जालन्यात तृतीय पंथीयांचे ( Protest in Jalna due to non-receipt of ration ) सरकारला गाजर दाखवून आंदोलन. जालना शहरातील तृतीय पंथीयांना त्यांच्या हक्काचे रेशन अद्याप मिळाले नाही. कालपासून दिवाळी ( Dinvali Festival ) सुरू झाली परंतु सर्वसामान्यांच्या हक्काचे रेशन अद्याप मिळालेले नाही.आता आम्हाला रेशन केंव्हा मिळणार हे कळायला मार्ग नासल्यामुळे आज जालना शहरातील गांधी चमन चौकात तृतीय पंथीयांनी सरकारच्या विरोधात घोषणा दिल्या

तृतीयपंथीयांचे सरकार विरोधात गाजर आंदोलन

सरकरचा निषेध -ह्या फसव्या सरकारच करायचं काय,खाली मुंडकं वर पाय. अशा घोषणांनी परिसर दणाणून टाकला. आनंदाचा शिधा या नावाखाली देण्यात येणार असल्याचे घोषित करूनही अद्याप न मिळालेल्या संतप्त तृतीय पंथीयांनी आपले रेशन कार्ड उंचावून दाखवत फसव्या सरकरचा निषेध केलाय.

यावेळी बोलतांना तनुजा सलमान पठाण या तृतीय पांथियाने सांगितले की, एप्रिल 2021 मध्ये केंद्रीय राज्यमंत्री रावसाहेब दानवे ( Union Minister of State Raosaheb Danve ) यांच्या हस्ते आम्हाला रेशन कार्ड वाटप करण्यात आले होते. परंतु अद्याप त्या कार्डवर रेशन मिळालेले नाही, त्यामुळे ही आमच्याशी बनवाबनवी असून आम्हाला आमच्या हक्काचे रेशन देण्यात यावे ही मागणी केली.

ABOUT THE AUTHOR

...view details