जालना - जिल्ह्यात जायकवाडीच्या धरणाच्या डाव्या कालव्याजवळ सुमारे ५० वर्षांपूर्वी बांधण्यात आलेला पूल शनिवारी दुपारी १२ वाजण्याच्या सुमारास कोसळला. दुपारच्या वेळेस ही घटना घडल्याने सुदैवाने जीवितहानी टळली. मात्र, सायंकाळी या मार्गावरिल वाहतूक खोळंबळी होती.
घनसांवगी तालुक्यातील तीर्थपुरी जवळून जायकवाडी धरणाचा डावा कालवा जातो. या कालव्यातून सद्या १६०० क्यूसेक क्षमतेने पाणी वाहत आहे. अशात एकलहेरा ते खापरदेव हिवरा या भागाला जोडणारा ५० वर्षे जुना पूल शनिवारी दुपारी कोसळला. या पूलाचे काम १९७० च्या दरम्यान झाल्याचे समजते. यात सुदैवाने जीवितहानी झाली नाही.