जालना Devendra Fadnavis News :आज (30 डिसेंबर) जालना रेल्वे स्थानकावरून 'वंदे भारत एक्सप्रेस' या आधुनिक रेल्वेचे शुभारंभ मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले. याप्रसंगी राज्याचे गृहमंत्री तथा उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी रेल्वेला हिरवा झेंडा दाखवला.
यावेळी अयोध्येतील राम मंदिराविषयी आपल्या भावना व्यक्त करत फडणवीस म्हणाले की, मी एक सेवक म्हणून राम मंदिर झाल्याबद्दल मनापासून समाधानी आहे. जो संघर्ष आम्ही केला त्या संघर्षाचे फळ आम्हा सर्वांना मिळाले आहे. या उद्घाटन प्रसंगी केंद्रीय रेल्वे राज्यमंत्री रावसाहेब पाटील दानवे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, पालकमंत्री अतुल सावे, विरोधी पक्षनेते अंबादास दानवे, राजेश राठोड, बबनराव लोणीकर, आमदार संतोष दानवे, आमदार नारायण कुचे, आमदार राजेश राठोड, माजी मंत्री अर्जुनराव खोतकर, आमदार कैलास गोरंट्याल आदी मान्यवर उपस्थित होते.
मराठा आंदोलकानं फडणवीसांच्या ताफ्याला दाखवले काळे झेंडे :उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे जालना दौऱ्यावर असताना बदनापूर येथे मराठा आंदोलकांकडून त्यांच्या ताफ्याला काळे झेंडे दाखवण्यात आले. मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावरुन मराठा आंदोलक सध्या आक्रमक झाल्याचं बघायला मिळतंय. या पार्श्वभूमीवर मराठा आंदोलकांकडून ठिकठिकाणी आंदोलनं केली जात आहेत. असं असतानाच आज (30 डिसेंबर) देवेंद्र फडणवीस यांनी बदनापूर येथील अखंड हरिनाम सप्ताहाला भेट दिली. त्यानंतर ते जालन्याकडे निघाले असता मराठा आंदोलकानं त्यांच्या ताफ्याला काळे झेंडे दाखवलेत. तसंच यावेळी त्यानं 'फडणवीस गो बॅक'च्या घोषणाही दिल्या. या प्रकरणी दोघांना पोलिसांनी ताब्यात घेतलंय.
हेही वाचा -
- लोकसभा निवडणूक जाहीर होण्यापूर्वीच देवेंद्र फडणवीस करणार झंझावाती दौरा
- आता देवेंद्र फडणवीसही होणार डॉक्टर; जपानमधील विद्यापीठाकडून मिळाला बहुमान
- नागपुरात काँग्रेसची सूक्ष्म रॅली; उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची टीका