महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

रावसाहेब दानवेंनी मांडले विजयाचे गणित, म्हणाले काँग्रेसला जनतेने नाकारले. . - loksabha

भाजप प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे यांनी विजयाचे गणित मांडले. मात्र खासदार चंद्रकांत खैरे यांच्या पराभवावर त्यांनी बोलणे टाळले.

भाजप प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे

By

Published : May 24, 2019, 5:13 PM IST

जालना- भाजप प्रदेशाध्यक्ष खासदार रावसाहेब दानवे यांनी जालना लोकसभा मतदार संघात विजय संपादित केला. नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वात केलेल्या कामांमुळे भाजपला भरघोस यश मिळाल्याचे रावसाहेब दानवे यांनी सांगितले. काँग्रेसला जनतेने सपशेल नाकारल्याचे मतही त्यांनी यावेळी व्यक्त केले.

भाजप प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे


मी आजारी असल्याने कुठेही प्रचाराला जाऊ शकलो नाही. तरीही मला विक्रमी मतं पडली. त्यामुळे जनतेचे आभार मानतो, असे देखील रावसाहेब दानवे यांनी सांगितले. राहुल गांधी यांचा पराभव झाला, त्यांच्या आजीचा देखील पराभव झाला होता. त्यात विशेष नाही, असे म्हणत दानवेंनी राहुलच्या पराभवचे विश्लेषण केले.

राज्यात देवेंद्र फडणवीस यांनी केलेले काम आणि नरेंद्र मोदी यांनी केंद्रात चांगले काम केले आहे. काँग्रेसने विश्वास गमावला आणि आम्ही विश्वास कमवला, त्यामुळे भाजपला विजय मिळाला. मतदारांची नरेंद्र मोदी यांना पुन्हा पंतप्रधान व्हावे अशी इच्छा होती. म्हणून सर्वत्र विजय मिळाल्याची प्रतिक्रिया रावसाहेब दानवे यांनी दिली. खासदार खैरे यांच्या पराभवावर बोलताना ते मला खात नाहीत, पण मला वेळ नाही असे म्हणत त्यांनी बोलणे टाळले. मात्र त्यांच्या वक्तव्याने उपस्थित कार्यर्कत्यांमध्ये हास्याची लहर उमटली.

ABOUT THE AUTHOR

...view details