जालना -भारतीय जनता पक्षाचे परतूर मतदार संघाचे उमेदवार म्हणून बबनराव लोणीकर यांनी आपला उमेदवारी अर्ज भरला आहे. काँग्रेसचे माजी आमदार कैलास गोरंट्याल यांनी जालना विधानसभेसाठी अर्ज दाखल केला आहे.
राज्याचे पाणीपुरवठा मंत्री कथा परतूरचे विद्यमान आमदार असलेल्या लोणीकर यांनी परतुर तहसीलमध्ये शक्तिप्रदर्शन करत आपला उमेदवारी अर्ज दाखल केला. काँग्रेसचे माजी आमदार सुरेशकुमार जेथलिया यांच्याशी त्यांची मुख्य लढत राहणार आहे. परतुर तहसील कार्यालयात अर्ज भरल्यानंतर रेल्वे गेट पासून ते तहसील कार्यालयापर्यंत रॅली काढण्यात आली. तसेच, जिल्हा परिषद शाळेच्या मैदानावर जाहीर सभेचे आयोजनही करण्यात आले होते. यावेळी, सोबत भाजपचे युवा मोर्चा प्रदेशाध्यक्ष राहुल लोणीकर यांच्यासह, साखरे आप्पा, भाजपचे माजी जिल्हाध्यक्ष भांदर्गे पाटील आदी उपस्थित होते.