महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

Accused Suicide Attempted Jalna : जालन्यात संशयित आरोपीचा पोलीस ठाण्यातच आत्महत्येचा प्रयत्न - आरोपीचा पोलीस ठाण्यातच आत्महत्येचा प्रयत्न

एका संशयित आरोपीने पोलीस ठाण्याच्या इमारतीवरून उडी ( Accused Suicide Attempted ) मारून आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला आहे. या घटनेमुळे एकच खळबळ उडाली आहे. जालना शहरातील कदीम जालना पोलीस ( Kadim Jalna Police ) ठाण्यातील हा धक्कादायक प्रकार समोर आला आहे.

कदीम जालना पोलीस ठाणे
कदीम जालना पोलीस ठाणे

By

Published : Apr 3, 2022, 7:15 PM IST

Updated : Apr 3, 2022, 7:30 PM IST

जालना -पोक्सो कायद्या अंतर्गत गुन्हा दाखल झालेल्या आणि पोलिसांच्या ताब्यात असलेल्या एका संशयित आरोपीने पोलीस ठाण्याच्या इमारतीवरून उडी ( Accused Suicide Attempted ) मारून आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला आहे. या घटनेमुळे एकच खळबळ उडाली आहे. जालना शहरातील कदीम जालना पोलीस ( Kadim Jalna Police ) ठाण्यातील हा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. या संशयित आरोपीचा एक हात फॅक्चर झाला असून तोंडाला मार लागला आहे. त्याला उपचारासाठी जिल्हा शासकीय रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे.

आत्महत्येचे प्रयत्न करणारा संशयित आरोपी
शहरातील एका अल्पवयीन मुलीला प्रेमाच्या जाळ्यात अडकवून तिचे अपहरण केल्याची घटना घडली होती. याप्रकरणी संशयित आरोपी विरुद्ध सदर बाजार पोलीस ठाण्यात अल्पवयीन मुलीच्या अपहरणाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. आरोपीला सदरबाजार पोलिसांच्या पथकाने मुंबईतुन रात्री उशिरा ताब्यात घेतले. शिवाय अल्पवयीन मुलीचे अपहरण करून तिच्यावर लैंगिक अत्याचार केल्या प्रकरणी पोक्सो कायद्यानुसार त्याच्यावर गुन्हा दाखल करून त्याला पिंक मोबाईल पोलिसांच्या ताब्यात दिले. अशातच आज (रविवारी) दुपारच्या सुमारास आरोपीने कदीम जालना पोलीस ठाण्याच्या इमारतीवरून उडी घेऊन आत्महत्या करण्याचा केला.
Last Updated : Apr 3, 2022, 7:30 PM IST

ABOUT THE AUTHOR

...view details