जालना -आज एटीएसनं देशभरातील पीएफआय ( PFI ) या संघटनेच्या कार्यालयावर छापेमारी करून काही जणांना ताब्यात घेतलं आहे. यामध्ये जालन्यातील अब्दुल हादी अब्दुल रौफ ( ATS Raid In Jalna ) याला जळगावमधून ताब्यात घेण्यात आलंय.अब्दुल हादी अब्दुल रौफ ( Abdul Hadi Abdul Rauf ) हा अनेक वर्षापासून पीएफआय या संघटनेचं काम करतो. रौफ हा मूळ जालन्यातील नेर सेवलीतील रहिवासी असून तो संघटनेच्या जालन्यातील सोशल मीडियाचं काम पाहत असल्याची माहिती समोर आलीय. यामुळे एकच खळबळ उडालीय.
20 जणांना अटक -महाराष्ट्रात टेरर फंडिंग ( terror funding case ) प्रकरणी 20 जणांना अटक करण्यात आली आहे. टेरर फंडिंग प्रकरणी देशभरात एनआयए, ईडीचे छापे सुरू आहेत. दरम्यान, दिल्लीतून एक मोठी बातमी समोर येत आहे. पीएफआयचे अध्यक्ष परवेझसह त्याच्या भावाला येथून अटक करण्यात आली आहे. याशिवाय पीएफआयचे राष्ट्रीय सचिव व्हीपी नजरुद्दीन यांनाही ताब्यात घेण्यात आले आहे. एनआयएचे पथक त्यांना सोबत घेऊन गेले असल्याचे सांगण्यात आले. एनआयए देशातील 10 राज्यांमध्ये छापे टाकत आहे. यादरम्यान 100 हून अधिक जणांना ताब्यात घेण्यात आले आहे.
महाराष्ट्रात एटीएसचे छापे -महाराष्ट्र एटीएसने पीएफआयविरुद्ध चार स्वतंत्र गुन्हेही दाखल केले आहेत. महाराष्ट्र एटीएसचे छापे देखील आज संपूर्ण राज्यात सुरू असून त्यात औरंगाबाद, बीड, परभणी पर्व, मालेगाव, मुंबई नवी मुंबईचा समावेश आहे. एटीएसने दिलेल्या माहितीनुसार, 20 जणांना ताब्यात घेण्यात आले आहे. मौलाना सैफुर रहमान याला मालेगाव येथून ताब्यात घेण्यात आले आहे. सैफुर रहमान हे पीएफआयचे नाशिक जिल्हा अध्यक्ष आहेत.