जालना - निवडणुकीमध्ये आज पहिल्यांदाच मतदारांच्या एवढ्या रांगा पाहिल्या आहेत. त्यामुळे ७५ टक्क्याच्यावर मतदान होणार असल्याचा अंदाज पशुसंवर्धन व दुग्धविकास राज्यमंत्री अर्जुन खोतकर यांनी व्यक्त केला.
मतदानासाठी आज पहिल्यांदाच एवढ्या रांगा बघितल्या - अर्जुन खोतकर
जालन्यातील संस्कार प्रबोधनी विद्यालयाच्या मतदान केंद्रावर खोतकर यांनी त्यांची पत्नी सीमा खोतकर आणि चिरंजीव अभिमन्यू खोतकर यांच्यासह मतदान केले.
पशुसंवर्धन व दुग्धविकास राज्यमंत्री अर्जुन खोतकर
शहरातील संस्कार प्रबोधनी विद्यालयाच्या मतदान केंद्रावर खोतकर यांनी त्यांची पत्नी सीमा खोतकर आणि चिरंजीव अभिमन्यू खोतकर यांच्यासह मतदान केले. यावेळी मतदान केंद्राबाहेर ते पत्रकारांशी बोलत होते.
आज सकाळी ७ वाजल्यापासूनच मतदान केंद्रांवर रांगा दिसत आहेत. मतदारांमध्ये हे पहिल्यांदाच एवढा उत्साह पाहायला मिळत आहे. मतदारांमध्ये प्रचंड उत्साह आहे. मी मतदान केले तसेच सर्व जनतेने मतदान करावे, असे आवाहनही त्यांनी यावेळी केले.