जालना - राज्याचे पशुसंवर्धन व दुग्धविकास राज्यमंत्री तथा जालन्याचे आमदार अर्जुन खोतकर यांनी आगामी विधानसभेसाठी शिवसेनेच्या वतीने उमेदवारी अर्ज दाखल केला आहे. उमेदवारी अर्ज भरण्यापूर्वी खोतकरांचे त्यांच्या घरी औक्षण करण्यात आले.
दुपारी खोतकरांच्या दर्शना या बंगल्यावर पत्नी आणि परिवारातील महिलांच्या हाताने औक्षण करून ते तहसील कार्यालयाकडे रवाना झाले. यावेळी त्यांच्या समवेत केंद्रीय राज्यमंत्री खासदार रावसाहेब दानवे, आमदार नारायण कुचे, आमदार संतोष दानवे, जिल्हा परिषद अध्यक्ष अनिरुद्ध खोतकर, शिवसेनेचे जिल्हाप्रमुख भास्कर अंबेकर, उद्योजक किशोर अग्रवाल, घनश्याम शेठ गोयल व कार्यकर्ते उपस्थित होते.