जालना - लोकशाहीर साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे यांची ९९ वी जयंती उत्साहात साजरी करण्यात आली. जुन्या जालन्यातील उड्डाण पुलाजवळ असलेल्या अण्णाभाऊंच्या पूर्णाकृती पुतळ्याजवळ आज साहित्यप्रेमींनी पुष्पहार घालून अण्णाभाऊंना वंदन केले.
जालन्यात साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे यांची जयंती उत्साहात साजरी
लोकशाहीर साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे यांची ९९ वी जयंती उत्साहात साजरी करण्यात आली. जुन्या जालन्यातील उड्डाण पुलाजवळ असलेल्या अण्णाभाऊंच्या पूर्णाकृती पुतळ्याजवळ आज साहित्यप्रेमींनी पुष्पहार घालून अण्णाभाऊंना वंदन केले.
नगराध्यक्ष संगीता गोरंट्याल तसेच विविध पक्ष कार्यकर्त्यांनी आणि संघटनांनीही अण्णाभाऊंना पुष्पहार अर्पण करून साठे यांना अभिवादन केले. यावेळी मुख्याधिकारी नितीन नार्वेकर, उमुख्य अधिकारी केशव कानपुडे यांची उपस्थिती होती.
यानिमित्ताने पुतळ्याच्या बाजूलाच अण्णाभाऊ साठे जयंती उत्सव समितीच्यावतीने संगीत जलसाचे आयोजन करण्यात आले होते. तसेच यावेळी विविध कार्यकर्त्यांचा पुष्पहार घालून सन्मान करण्यात आला. दुपारनंतर शहरातून अण्णाभाऊ साठे यांच्या पूर्णाकृती प्रतिमेची वाजत गाजत मिरवणूक काढण्यात आली. साठे यांच्या अनुयायांनी यामध्ये मोठ्या प्रमाणात सहभाग नोंदविला होता.