जालना - डॉक्टरांवरील होत असलेल्या हल्ल्याचा इंडियन मेडिकल असोसिएशनच्या जालना शाखेच्यावतीने रॅली काढून निषेध करण्यात आला. शहरातील भोकरदन नाका परिसरात असलेल्या इंडियन मेडिकल असोसिएशनच्या कार्यालयापासून सकाळी 11 वाजता डॉक्टरांनी दुचाकीवरून रॅली काढली. बस स्थानक, मामा चौक, सराफामार्गे शिवाजी पुतळा आणि परत मामा चौकात येऊन समारोप झाला.
पश्चिम बंगालमध्ये डॉक्टरांना झालेल्या मारहाणीच्या निषेधार्थ बंगालच्या डॉक्टरांचा गेल्या ११ जूनपासून संप सुरू आहे. त्याच्या समर्थनार्थ देशातील डॉक्टरांनी एक दिवसाचा संप पुकारण्याचे आवाहन आयएमएने केले होते. त्यानुसार हा बंद पुकारण्यात आला आहे. इंडियन मेडिकल असोसिएशनच्या अध्यक्षा डॉक्टर कल्पना भन्साली यांनी डॉक्टरांवरील होणारे हल्ले हे चिंताजनक आहेत आणि त्याचा संघटनेच्यावतीने निषेध करण्यात येणार असून पुढील चोवीस तासांसाठी अत्यावश्यक सेवा वगळता इतर सर्व सेवा पूर्णपणे बंद करण्यात आल्याची माहिती दिली.