जालना - जिल्ह्यात आणि विशेषत: शहरात वाढणारा कोरोना बाधित रुग्णांचा वाढता आकडा लक्षात घेता जालना शहरात असलेल्या कुंडलिका नदीवरील चारही पूल बंद करण्यात येणार आहेत. नवीन जालना भागातील कोरोना बाधित रुग्णांची वाढती संख्या लक्षात घेता, याचा प्रादुर्भाव जुना जालना भागातील नागरिकांवर होऊ नये, म्हणून रुग्णवाहिकांव्यतिरिक्त अन्य कोणतेही वाहने या पुलावरून जाणार नाही. अत्यावश्यक असल्यास बायपास चा वापर करावा लागणार आहे. या निर्णयामुळे कोरोनाला आळा बसेल असे मत प्रशासकीय अधिकाऱ्यांनी व्यक्त केले.
जालना शहरातील चारही पूल होणार बंद; कोरोनाच्या पार्श्वभूमीवर जिल्हा प्रशासनाचा निर्णय
नवीन जालना वसाहतीत असलेली दाट वस्ती लक्षात घेता कोरोनाची संख्या वाढत असल्याचा अंदाज जिल्हा प्रशासनाने वर्तवला आहे. यामुळे हा संसर्ग वाढू नये, तसेच गर्दीपासून अलिप्त ठेवण्यासाठी प्रशासनाने हे पूल बंद करण्याचा निर्णय घेतला आहे.
जिल्हाधिकारी रवींद्र बिनवडे यांनी घेतलेली पत्रकार परिषद
जिल्हाधिकारी रवींद्र बिनवडे यांच्या उपस्थितीत पार पडलेल्या वरिष्ठ अधिकाऱ्यांची पत्रकार परिषदेला, पोलीस अधीक्षक एस. चैतन्य जीपच्या मुख्य कार्यकारी अधिकारी श्रीमती निमा अरोरा, जिल्हा शल्य चिकित्सक डॉ.मधुकर राठोड नोडल ऑफिसर डॉ.कडले, डॉ जगताप, उपजिल्हाधिकारी रवींद्र परळीकर आदींची उपस्थिती होती.
हेही वाचा -'बा विठ्ठला...! देशासह राज्यावरील कोरोनाचे संकट लवकर दूर होऊ दे'