जालना -तालुक्यातील पाहेगाव येथील रमेश नामदेव शेळके या शिवसैनिकाचा आठ फेब्रुवारी रोजी खून करण्यात आला होता. त्यांची कार जाळून टाकून मृतदेह देखील नष्ट करण्याचा प्रयत्न केला गेला. याप्रकरणी आरोपी असलेले लोक गावामध्ये फिरत आहेत. त्या संदर्भात पोलिसांना माहिती देऊनही पोलीस त्यांना अटक करत नाहीत. या घटनेच्या निषेधार्थ मृतांच्या नातेवाइकांनी पोलीस अधीक्षक कार्यालयात उपोषण सुरू केले आहे.
वडिलांच्या हत्यारांना पकडण्यास पोलिसांची टाळाटाळ; फिर्यादींचे उपोषण - जालना हत्या न्यूज
पाडेगाव येथील रमेश शेळके यांना आडरानामध्ये अडवून जाळून टाकले आणि त्यांच्या चारचाकी वाहनाला देखील आग लावली होती. यानंतर तालुका जालना पोलीस ठाण्यात गुन्हाही नोंद करण्यात आला.
पोलिसांचा कानाडोळा
पाडेगाव येथील रमेश शेळके यांना आडरानामध्ये अडवून जाळून टाकले आणि त्यांच्या चारचाकी वाहनाला देखील आग लावली होती. यानंतर तालुका जालना पोलीस ठाण्यात गुन्हाही नोंद करण्यात आला. मृतांच्या नातेवाईकांनी पोलिसांना वारंवार या आरोपींची नावेही सांगितली आणि त्यांचे ठिकाणी सांगितले. मात्र, या प्रकरणात आरोपी असलेले लोक घटना घडल्यापासून फरार होते. त्यानंतर ते दिनांक 28 मे रोजी रात्री नऊ वाजेच्या सुमारास एका ठिकाणी आले असल्याची माहिती पोलीस अधीक्षकांना देखील फोनवरून दिली होती. मात्र, पोलिसांनी त्याकडे कानाडोळा केला. आरोपींना पळून जाण्यासाठी वाव देऊन नंतर थातुरमातुर कारवाई केली, असा गंभीर आरोप मयत रमेश शेळके यांचा मुलगा अक्षय शेळके यांनी केला आहे.
आरोपींवर कारवाई करण्याची मागणी
ही दुर्घटना घडल्यानंतर फिर्यादीने वारंवार पोलीस अधीक्षकांना निवेदन देऊन आरोपींवर कारवाई करण्याची मागणी केली आहे. मात्र, पोलीस त्यांना पाठीशी घालत आहेत. याचा निषेध म्हणून आज मृत रमेश शेळके यांचा मुलगा अक्षय शेळके, राहुल रमेश शेळके, तसेच कालींदा शेळके, वंदना शेळके, यांनी पोलीस अधीक्षक कार्यालयात आमरण उपोषण सुरू केले आहे.