जालना -अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेच्या 'प्रतिभा संगम' या अठराव्या राज्यस्तरीय साहित्य संमेलनाला जालन्यात सुरुवात झाली. जालन्यातील अग्रेशन फाउंडेशन येथे साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे नगरीत हे संमेलन आयोजित करण्यात आले आहे. ज्येष्ठ समीक्षक डॉ. अक्षयकुमार काळे यांच्या हस्ते संमेलनाचे उद्घाटन झाले.
अठराव्या राज्यस्तरीय साहित्य संमेलनासाठी राज्याच्या विविध भागांतून विद्यार्थी आले आहेत. त्यांच्यासाठी तीन दिवस वैविध्यपूर्ण कार्यक्रमांचे आणि उपक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. या साहित्य संमेलनाच्या माध्यमातून विद्यार्थी साहित्यिकांना हक्काचे व्यासपीठ मिळाले आहे, असे मत नगराध्यक्षा संगीता गोरंट्याल यांनी व्यक्त केले.