महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

जालन्यात दशक्रियाविधी दरम्यान आंघोळ करताना व्यक्तीचा नदीत बुडून मृत्यू - केळणा नदी बातमी

दशक्रियाविधीला गेलेल्या व्यक्तीचा शुक्रवारी नदीत बुडून मृत्यू झाल्याची घडना घडली आहे. पोहता येत नसल्याने नदीत बुडून मृत्यू झाला आहे. ही घटना रामपूर शिवारातील केळणा नदी पात्रात ही व्यक्ती बुडाली.

देविदास सुरडकर

By

Published : Sep 27, 2019, 9:19 PM IST

जालना -दशक्रियाविधीला गेलेल्या व्यक्तीचा शुक्रवारी नदीत बुडून मृत्यू झाल्याची घडना घडली आहे. पोहता येत नसल्याने नदीत बुडून मृत्यू झाला आहे. ही घटना रामपूर शिवारातील केळणा नदी पात्रात ही व्यक्ती बुडाली.

हेही वाचा - मुलावर बलात्काराचा गुन्हा दाखल झाल्याने वडिलांची आत्महत्या

शुक्रवारी सकाळी साडे आठ वाजता दिलीप देविदास सुरडकर (खंडोबा गल्ली, भोकरदन, वय ४०) वर्ष असे बुडालेल्या व्यक्तीचे नाव आहे. सुरडकर यांचा चुलत भाऊ गजानन सुरडकर या २८ वर्षीय तरुणाचे गेल्या आठवड्यात ह्रदयविकाराच्या धक्क्याने निधन झाले होते. त्याचा दहाव्याचा कार्यक्रम भोकरदनपासून जवळच असलेल्या रामेश्वर मंदिराजवळ सुरू असताना दिलीप देविदास सुरडकर यांनी नदीपात्रात अंघोळीसाठी उडी मारली. मात्र पाणी खोल असल्याने त्यांना पाण्याचा अंदाज आला नाही व पाण्यात बुडून त्यांचा मृत्यू झाला.

हेही वाचा - झारखंडमध्ये पुन्हा मॉबलिंचिंग; एकाचा मृत्यू दोन गंभीर जखमी

सध्या नदीपात्रामध्ये वाळूमाफियांनी बेसुमार वाळू उपसा करत मोठमोठे खड्डे करून ठेवलेले आहे. या खड्ड्यामुळेच अशा घटना घडत असल्याची चर्चा आहे. दरम्यान दिलीप सुरडकर यांच्या पश्चात पत्नी, आई, भाऊ, एक मुलगा, एक मुलगी, बहिण असा परिवार आहे याप्रकरणी ग्रामीण रुग्णालयात शवविच्छेदन करून शोकाकुल वातावरणात सुरडकर यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले.

ABOUT THE AUTHOR

...view details