जालना - भोकरदन तालुक्यातील बाजार येथे मंगलसिंग शिवसिंग बमनावत (वय-५०) यांनी राहत्या घरी गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना ११ जूनला घडली. यामागील कारण अद्याप अस्पष्ट असूनह पोलीस अधिक तपास करत आहेत.
भोकरदनमध्ये ५० वर्षांच्या व्यक्तीची आत्महत्या; गळफास घेऊन संपवले आयुष्य - जालन्यात आत्महत्या
भोकरदन तालुक्यातील बाजार परिसरातील मंगलसिंग शिवसिंग बमनावत (वय-५०) यांनी राहत्या घरी गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना ११ जूनला घडली.
कुटुंबीय सकाळी चहा देण्यासाठी त्यांच्या खोलीत आल्याने संबंधित प्रकार उघडकीस आला. त्यांना तत्काळ भोकरदन येथील ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. यानंतर शवविच्छेदन करून मृतदेह नातेवाईकांच्या ताब्यात देण्यात आला आहे. भोकरदनच्या ग्रामीण रुग्णालयातील वैद्यकीय अधिकारी डॉ.डी.बी.सोनी यांच्या एमएलसी पत्रावरून अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.
भोकरदन पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास पोलीस नाईक जाधव करत आहेत. मृत मंगलसिंग यांच्या पश्चात त्यांचे वडील, आई, दोन भाऊ आणि तीन मुलींसह एक मुलगा असा परिवार आहे.