जालना- जिल्ह्यात कोरोनाची लागण झालेल्या पाच रुग्णांची शुक्रवारी भर पडली आहे. जिल्ह्यात आता एकूण 23 कोरोनाबाधितांची संख्या झाली आहे.
जालन्यात शुक्रवारी आढळले 5 नवीन कोरोनाबाधित, एकूण आकडा 23 - जालना कोरोना रुग्ण
मालेगाव येथे गेलेल्या जालना राज्य राखीव पोलीस बल गट क्रमांक तीनमधील परत आलेल्या जवानांना भोकरदन येथे विलगीकरण करण्यात आले होते. या जवानांपैकी चार जणांचा अहवाल पॉझिटिव्ह आला आहे.
जालना जिल्ह्यामध्ये कोरोनाची लागण झालेल्या रुग्णांची संख्या वाढतच आहे. ही एक चिंतेची बाब असली तरी दुसरीकडे कोरोनामुक्त झालेल्या सात रुग्णांना घरी सोडण्यात आरोग्य विभागाला यशही आले आहे.
मालेगाव येथे गेलेल्या जालना राज्य राखीव पोलीस बल गट क्रमांक तीन मधील परत आलेल्या जवानांना भोकरदन येथे विलगीकरण करण्यात आले होते. या जवानांपैकी चार जणांचा अहवाल पॉझिटिव्ह आला आहे. तर, जालना शहरातील एका खासगी डॉक्टरलाही कोरोनाची लागण झाल्याचे निष्पन्न झाले आहे. त्यामुळे जालना जिल्ह्यात एकूण 23 जणांना कोरोनाची लागण झाली आहे.