जालना- जिल्ह्यातील अंबड चारा छावणीमध्ये चारा आणि पाण्याअभावी ४ जनावरांचा मृत्यू झाला आहे. यामध्ये ३ वासरे आणि एक म्हैस दगावली आहे. चारा छावण्यांचे देयके शासनाकडे थकल्यामुळे हा प्रकार घडल्याचे सांगण्यात येत आहे.
जालन्यात चारा छावणीचे २३ लाख रुपये शासनाकडे थकले; चाऱ्याअभावी ४ जनावरांचा मृत्यू
छावणीचे तब्बल २३ लाख रुपये शासनाकडे थकलेले आहेत. यासंदर्भातील बिले शासनाकडे जमा करूनही शासनाने पैसे न दिल्याने गेल्या ३ दिवसांपासून चारापाणी नाही. त्यामुळे ३ वासरे आणि एक म्हैस दगावली आहे. परिणामी शेतकरी तिव्र संताप व्यक्त करीत आहेत.
मुख्यमंत्र्यांनी चारा छावण्यांबाबत जालना जिल्हाधिकाऱ्यांवर नाराजी व्यक्त केली होती. त्यानंतर त्यांनी गडबडीने चारा छावण्यांना मंजुरी दिली. त्यानंतर घाईगडबडीत चारा छावण्या उभारण्यात आल्या. त्यामधून अंबड येथे गेल्या ४ मे रोजी राष्ट्रमाता जिजाऊ सहकारी संस्थेने चारा छावणी सुरू केली आहे. विनोद भागुजी खले हे ही चारा छावणी चालवतात. या छावणीचे तब्बल २३ लाख रुपये शासनाकडे थकलेले आहेत. यासंदर्भातील बिले शासनाकडे जमा करूनही शासनाने पैसे न दिल्याने गेल्या ३ दिवसांपासून चारापाणी नाही. त्यामुळे ३ वासरे आणि एक म्हैस दगावली आहे. परिणामी शेतकरी तिव्र संताप व्यक्त करीत आहेत.
शेतकरी अंबडच्या तहसील कार्यालयात तक्रार करण्यासाठी गेले होते. मात्र, अंबडच्या तहसीलदार मनिषा मेने यांनी या प्रकरणाची गांभीर्याने दखल घेतली नाही. त्यामुळे शेतकरी तहसील कार्यालयातच ठाण मांडून बसले होते.