जालना - बसस्थानकातून परराज्यातील कामगारांना नेऊन सोडण्यासाठी महाराष्ट्राच्या सीमेवर आतापर्यंत 35 बस सोडण्यात आल्या आहेत तर महाराष्ट्राच्या सीमेवरून जालना जिल्ह्यामध्ये कामगारांच्या दोन बस जालन बसस्थानकात आल्या आहेत. या कामगारांची जिल्हा प्रशासनाच्या वतीने प्राथमिक आरोग्य तपासणी करण्यात आली असून त्यांच्या हातावर होम क्वारंटाईनेच शिक्के मारण्यात आले आहेत.
जालना बसस्थानकातून कामगारांच्या 35 बस रवाना तर 2 बस दाखल - migrant workers jalna
जालना बसस्थानकातून मध्यप्रदेशच्या सीमेवर कामगारांना सोडण्यासाठी एका बस मध्ये 22 कामगार अशा पद्धतीने आत्तापर्यंत 35 बसेस सोडण्यात आल्या आहेत, अशी माहिती विभागीय वाहतूक अधिकारी प्रमोद नेहुल यांनी दिली.
जालना बसस्थानकामध्ये गुजरात राज्याच्या सीमेवरून दोन बस आल्या आहेत. या बसमध्ये मंठा आणि जालना तालुक्यातील कामगार आहेत. आलेल्या प्रवाशांची वैद्यकीय अधिकारी डॉ. एस. ए. रहमानी, आरोग्य सेवक रवींद्र सोनार, मधुकर नेहते, या जिल्हा परिषदेच्या कर्मचाऱ्यांनी तपासणी केली. यावेळी ग्रामसेवक एस. आर. पाचगे हे देखील उपस्थित होते. पालघर जिल्ह्यातून बस चालक रितेश पंजाबराव पवार या डहाणू डेपोच्या बसमध्ये (क्रमांक एम. एच. 14 बीटी 4325) बसमध्ये 22 प्रवासी अशा पद्धतीने सुमारे 40 प्रवासी आले आहेत. या प्रवाशांना सोडल्यानंतर ही बस निर्जंतुकीकरण करून परत पाठविली जाणार आहे.
दरम्यान, जालना बसस्थानकातून मध्यप्रदेशच्या सीमेवर कामगारांना सोडण्यासाठी एका बस मध्ये 22 कामगार अशा पद्धतीने आत्तापर्यंत 35 बसेस सोडण्यात आल्या आहेत. येताना या बस रिकाम्या येणार आहेत, अशी माहिती विभागीय वाहतूक अधिकारी प्रमोद नेहुल यांनी दिली.