महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

3 School Children Drowned : ओढ्यात बुडून 3 शाळकरी विद्यार्थ्यांचा मृत्यू

शाळा सुटल्यानंतर ओढयातील पाण्यात पोहण्यासाठी गेलेल्या 3 शाळकरी विद्यार्थ्यांचा पाण्यात बुडून मृत्यू झाला ( Three children drowned in Jalna ) आहे. जालन्यातील संकणापुरी गावात ही घटना घडलीय. 13 वर्षीय अजय टेकाळे, 10 वर्षीय करण नाचण आणि 10 वर्षीय उमेश नाचण अशी मृत्युमुखी पडलेल्या विद्यार्थ्यांची नाव असून यामध्ये दोन सख्ख्या भावांसह त्यांच्या एका मित्राचा समावेश आहे. शाळा सुटल्यानंतर हे तिन्हीही विद्यार्थी घरी परतले नसल्यानं त्यांची शोधाशोध सुरु झाली .मात्र ते सापडले नाही. या तिघांचेही दप्तर ही ओढ्याजवळ पडलेले असल्याची माहिती गावकऱ्यांना मिळाल्यानंतर गावकऱ्यांनी ओढ्यातील पाण्यात त्यांचा शोध घेतला. यावेळी तिघांचेही मृतदेह पाण्यात आढळून आले. या घटनेनंतर परिसरातील गावांमध्ये शोककळा पसरली असून हळहळ व्यक्त होत आहे.

3 School Children Drowned
3 शाळकरी विद्यार्थ्यांचा पाण्यात बुडून मृत्यू

By

Published : Mar 25, 2022, 12:20 PM IST

Updated : Mar 25, 2022, 12:26 PM IST

जालना - शाळा सुटल्यानंतर ओढयातील पाण्यात पोहण्यासाठी गेलेल्या 3 शाळकरी विद्यार्थ्यांचा पाण्यात बुडून ( Three children drowned in Jalna ) मृत्यू झाला आहे. जालन्यातील संकणापुरी गावात ही घटना घडलीय. 13 वर्षीय अजय टेकाळे, 10 वर्षीय करण नाचण आणि 10 वर्षीय उमेश नाचण अशी मृत्युमुखी पडलेल्या विद्यार्थ्यांची नाव असून यामध्ये दोन सख्ख्या भावांसह त्यांच्या एका मित्राचा समावेश आहे. शाळा सुटल्यानंतर हे तिन्हीही विद्यार्थी घरी परतले नसल्यानं त्यांची शोधाशोध सुरु झाली .मात्र ते सापडले नाही. या तिघांचेही दप्तर ही ओढ्याजवळ पडलेले असल्याची माहिती गावकऱ्यांना मिळाल्यानंतर गावकऱ्यांनी ओढ्यातील पाण्यात त्यांचा शोध घेतला. यावेळी तिघांचेही मृतदेह पाण्यात आढळून आले. या घटनेनंतर परिसरातील गावांमध्ये शोककळा पसरली असून हळहळ व्यक्त होत आहे.

ओढ्यात बुडून 3 शाळकरी विद्यार्थ्यांचा मृत्यू
Last Updated : Mar 25, 2022, 12:26 PM IST

ABOUT THE AUTHOR

...view details