महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

मिरचीचा स्प्रे मारून तीन लाखांची रोकड पळवली; बँकेचे दोन कर्मचारी जखमी - jalna crime news

बुलढाणा अर्बन बँकेच्या दोन कर्मचाऱ्यांना अडवून मारहाण करत तीन लाखांची रोकड लंपास केल्याचा प्रकार समोर आला आहे. अज्ञात व्यक्तीने पाळत ठेवून हनुमान मंदिराजवळ त्यांची दुचाकी आडवली; आणि रक्कम लंपास केली.

3 lakhs stolen by unknown
मिरचीचा स्प्रे मारून तीन लाखांची रोकड पळवली

By

Published : Dec 9, 2019, 2:12 PM IST

जालना - बुलढाणा अर्बन बँकेच्या दोन कर्मचाऱ्यांना अडवून मारहाण करत तीन लाखांची रोकड लंपास केल्याचा प्रकार समोर आला आहे. नवीन जालना शाखेतून मोंढा शाखेत संबंधित रक्कम घेऊन जात असताना सकाळी पावणे अकराच्या सुमारास ही घटना घडली.

मिरचीचा स्प्रे मारून तीन लाखांची रोकड पळवली

बँकेचे दोन कर्मचारी दुचाकीवरुन सकाळी 10:55 ला निघाले होते. यावेळी अज्ञात व्यक्तीने पाळत ठेवून हनुमान मंदिराजवळ त्यांची दुचाकी आडवली.

दोन वेगवेगळ्या मोटरसायकलवरुन आलेल्या अज्ञात व्यक्तींनी कर्मचाऱ्यांच्या डोळ्यात मिरचीचा स्प्रे मारला. पैशाची बॅग देण्यासाठी विरोध होत असल्याचे लक्षात येताच कुदळीच्या दांड्याने चोरट्यांनी कर्मचाऱ्यांना मारहाण केली.

हे दोन्ही कर्मचारी सध्या हॉस्पिटलमध्ये उपचार घेत आहेत. दोघांनाही डोक्याला मार लागल्याने टाके पडले आहेत.

ABOUT THE AUTHOR

...view details