जालना - बदनापूर तालुक्यातील वरुडी फाट्यावरून 3 लाख रुपये किमतीचा 10 किलो गांजा जप्त करण्यात आला आहे. विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर तैनात स्थिर पथकातील निवडणूक विभागाचे कर्मचारी आणि पोलीस कर्मचाऱ्यांनी सदरील कारवाई केली.
जालना : वरुडी फाट्यावरून 3 लाख रुपये किमतीचा 10 किलो गांजा जप्त - जालन्यातून गांजा जप्त
बदनापूर तालुक्यातील वरुडी फाट्यावरून 3 लाख रुपये किमतीचा 10 किलो गांजा जप्त करण्यात आला आहे. वाहनांची तपासणी करताना मीर्झा अजमत बेग या इसमाकडे ही गांजा असलेली बॅग पोलिसांना आढळून आला.
हेही वाचा -ईटीव्ही भारत इम्पॅक्ट : बोंडअळी, लष्करी अळी नियंत्रणासाठी शेतकऱ्यांना कीटकनाशकांचे वाटप
क्रूझर जिप (क्रमांक एम एच 28 व्ही 9443) या वाहनात एका बॅगमध्ये हा गांजा मिळाला. वाहनांची तपासणी करताना मीर्झा अजमत बेग या इसमाकडे ही गांजा असलेली बॅग पोलिसांना आढळून आला. पोलीस निरीक्षक मारुती खेडकर यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस हेड कॉन्टेबाल आय. जी. शेख, व्ही. एस. उज्जैनकर, बी. डी .जारवाल यांनी ही कारवाई केली. दरम्यान संबंधीतावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.