जळगाव-जिल्ह्यातील चाळीसगाव तालुक्यातील तळेगाव शिवारात कुत्र्यांनी हल्ला करून एका हरणाला जखमी केल्याची घटना घडली होती. जखमी हरणावर उपचार करून वन्यजीवप्रेमींनी त्याला जीवदान दिले आहे. वन्यजीवप्रेमींनी दाखवलेल्या भूतदयेचे कौतुक केले जात आहे.
कुत्र्यांच्या हल्ल्यात जखमी झालेल्या हरणाचे वाचवले प्राण; वन्य जीवप्रेमींच्या भूतदयेचे कौतुक - animal
जळगाव जिल्ह्यातील चाळीसगाव तालुक्यात असलेल्या तळेगाव शिवारात हरणांच्या कळपातून सैरभैर झालेल्या एका हरणाला कुत्र्यांनी हल्ला करत जखमी केले होते.
सध्या खरीप हंगामाचे दिवस असल्याने वनक्षेत्राजवळ असलेल्या शेतांमध्ये कोवळी पिके खाण्यासाठी मोठ्या प्रमाणात हरणांचे कळप जंगलातून शेतांमध्ये येत आहेत. जळगाव जिल्ह्यातील चाळीसगाव तालुक्यात असलेल्या तळेगाव शिवारात हरणांच्या कळपातून सैरभैर झालेल्या एका हरणाला कुत्र्यांनी हल्ला करत जखमी केले होते. या जखमी हरणाला कैलास राठोड, अर्जुन राठोड तसेच मानद वन्यजीव रक्षक राजेश ठोंबरे यांनी वन विभागाच्या कार्यालयात आणले.
पशू वैद्यकीय अधिकाऱ्यांनी त्याच्यावर त्वरित उपचार केल्याने त्याचे प्राण वाचले. जखमा बऱ्या झाल्यानंतर हरणाला त्याच्या अधिवासात सोडण्यात आले. दरम्यान, पशू वैद्यकीय अधिकाऱ्यांनी जखमी हरणावर सुश्रूषा करताना खूप काळजी घेतली. हरणाच्या शरीरावर ठिकठिकाणी मोठ्या जखमा झालेल्या होत्या. वेळीच औषधोपचार मिळाल्याने हरीण लवकर बरे झाले.