जळगाव-जिल्ह्यातील भुसावळ तालुक्यातील हतनूर येथे तापी नदीवर असलेल्या हतनूर धरणाच्या पाणलोट क्षेत्रात गेल्या 24 तासात जोरदार पाऊस झाला आहे. त्यामुळे खबरदारी म्हणून शनिवारी रात्री 8 वाजता हतनूर प्रकल्पाचे 36 दरवाजे पूर्ण क्षमतेने उघडले असून, धरणातून 1 लाख 45 हजार 235 क्युसेक इतका पाणी विसर्ग तापी नदीपात्रात सोडण्यात आला आहे.
हतनूर धरणाच्या पाणलोट क्षेत्रात गेल्या 24 तासांपासून मुसळधार पाऊस पडत आहे. याशिवाय पूर्णा नदीच्या पाणलोट क्षेत्रातही जोरदार पाऊस झाल्याने पूर्णा नदीच्या पाणीपातळीत वाढ झाली आहे. शनिवारी दिवसभर पाऊस सुरू असल्याने हतनूर धरणाचे दरवाजे टप्प्याटप्प्याने उघडले जात होते. मात्र, रात्री तापी नदीच्या पाणी पातळीत मोठ्या प्रमाणावर वाढ झाल्याने धरणाचे 36 दरवाजे उघडण्यात येऊन पाण्याचा विसर्ग नदीपात्रात सोडण्यात आला.