जळगाव- भारत गॅस एजन्सीसमोर उभ्या असलेल्या ट्रकमधून चोरट्यांनी १२ सिलिंडर चोरून नेले. या प्रकरणी शनिवारी एमआयडीसी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. निवृत्ती पांडुरंग महाजन असे त्या तक्रार दाखल केलेल्या ट्रक चालकाचे नाव आहे.
जळगाव शहरातील अयोध्यानगरात निवृत्ती पांडुरंग महाजन हे भारत गॅस एजन्सीत ट्रक चालक म्हणून काम करतात. ते मुंबईतील राजेश देवीदास बोरसे यांच्या मालकीचा ट्रक क्रमांक (एमएच ०४, सीपी ५५६७ ) वर गेल्या चार वर्षांपासून कामाला आहेत. २१ मे रोजी औरंगाबाद येथून गॅस एजन्सीतून दुपारी १२ . ३० वाजता ट्रकमध्ये गॅस सिलिंडर भरून सायंकाळी ६ वाजता जळगावात दाखल झाले.