महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

अयोध्या प्रकरणी सर्वोच्च न्यायालयाचा निकाल सर्वांनी स्वीकारावा- उज्ज्वल निकम - अयोध्या प्रकरणाचा निकाल

अयोध्या प्रकरणाचा निकाल संवेदनशील तसेच धार्मिक बाबीशी निगडीत आहे. शनिवारी येणारा सर्वोच्च न्यायालयाच्या निकाल सर्वांनी स्वीकारला पाहिजे, असे आवाहन यावेळी उज्ज्वल निकम यांनी जळगावात केले आहे. अयोध्या निकालाच्या पार्श्वभूमीवर उज्ज्वल निकम यांनी आपली प्रतिक्रिया प्रसारमाध्यमांशी बोलताना व्यक्त केली.

अयोध्या प्रकरणी सर्वोच्च न्यायालयाचा निकाल सर्वांनी स्वीकारावा- उज्ज्वल निकम

By

Published : Nov 9, 2019, 1:52 AM IST

जळगाव-अलाहाबाद न्यायालयाने दिलेल्या निकालाविरोधात सर्वोच्च न्यायालयात अपील करण्यात आले होते. या आव्हानावर सर्वोच्च न्यायालय शनिवारी निकाल देणार आहे. तरी सर्व नागरिकांनी जो काही निकाल न्यायालय देईल तो मान्य करावा, असे आवाहन विशेष सरकारी वकील उज्ज्वल निकम यांनी के्ले आहे.

अयोध्या प्रकरणाचा निकाल संवेदनशील तसेच धार्मिक बाबीशी निगडीत आहे. शनिवारी येणारा सर्वोच्च न्यायालयाच्या निकाल सर्वांनी स्वीकारला पाहिजे, असे आवाहन यावेळी उज्ज्वल निकम यांनी जळगावात केले आहे. अयोध्या निकालाच्या पार्श्वभूमीवर उज्ज्वल निकम यांनी आपली प्रतिक्रिया प्रसारमाध्यमांशी बोलताना व्यक्त केली. ते पुढे म्हणाले, अयोध्या प्रकरणाच्या निकालासंदर्भात समाज माध्यमांवर पसरणाऱ्या अफवांकडे दुर्लक्ष करून कायदा व सुव्यवस्था राखण्यासाठी शांततेचा भंग होणार नाही, धार्मिक सलोखा बिघडणार नाही, याची काळजी प्रत्येकाने घ्यायला हवी. न्यायालयाने दिलेला निकाल प्रत्येकाने पाळायला हवा, असेही ते म्हणाले.

ABOUT THE AUTHOR

...view details