जळगाव -'हैदराबाद बलात्कार आणि हत्या प्रकरणातील पीडितेला झटपट न्याय मिळाला, या भावनेतून सर्वसामान्य नागरिक हैदराबाद एन्काऊंटरच्या घटनेमुळे खूश झाला आहे. सर्वसामान्य नागरिक म्हणून माझीही हीच भावना आहे. परंतु, कायद्याचा अभ्यासक म्हणून मी या घटनेचे समर्थन करणार नाही,' असे मत राज्याचे विशेष सरकारी वकील उज्ज्वल निकम यांनी व्यक्त केले आहे. या घटनेसंदर्भात 'ई टीव्ही भारत'ने निकम यांच्याशी संवाद साधला.
कायद्याचा अभ्यासक म्हणून हैदराबाद एन्काऊंटरचे समर्थन करणार नाही- उज्ज्वल निकम - #telanganapolice
'पीडितेला न्याय मिळाला या भावनेतून सर्वसामान्य माणूस आज आनंदी आहे. सर्वसामान्य नागरिक म्हणून माझीही हीच भावना आहे. मात्र, शासन आणि न्यायपालिकेने या घटनेमुळे अंतर्मुख होण्याची गरज आहे,' असे निकम म्हणाले.
'हैदराबाद येथे एका पशुवैद्यक डॉक्टर महिलेवर चार नराधमांनी अमानुष अत्याचार करत तिची जिवंत जाळून हत्या केली होती. मागील आठवड्यात ही संतापजनक घटना घडली होती. या घटनेतील चारही आरोपींचे आज पहाटे हैदराबाद पोलिसांनी एन्काऊंटर केले. कायद्याच्या बाजूने विचार केला तर घडलेली घटना ही चुकीची आहे, असे माझे स्पष्ट मत आहे,' अशी प्रतिक्रिया निकम यांनी दिली आहे.
'पीडितेला न्याय मिळाला या भावनेतून सर्वसामान्य माणूस आज आनंदी आहे. मात्र, शासन आणि न्यायपालिकेने या घटनेमुळे अंतर्मुख होण्याची गरज आहे. हैदराबाद पोलिसांनी केलेल्या एन्काऊंटरचे मी कायद्याचा अभ्यासक म्हणून समर्थन करणार नाही. कारण हैद्राबाद पोलिसांनी दिलेल्या स्पष्टीकरणानुसार, त्याठिकाणी पोलिसांनी ज्या परिस्थितीत गोळीबार केला आणि तेथील परिस्थिती पाहता ती गोळीबार करण्यासारखी नव्हती, असे माझे स्पष्ट मत आहे,' असे ते पुढे म्हणाले.