महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

..म्हणून माजी आमदार डॉ. बी. एस. पाटलांना झाली मारहाण - उदय वाघ - बी. एस. पाटील

डॉ. बी. एस. पाटील यांना झालेल्या मारहाणीचे भाजपचे जळगाव जिल्हाध्यक्ष उदय वाघ यांनी समर्थन केले आहे. या वादानंतर वाघ दाम्पत्याने आपली भूमिका 'ई- टीव्ही भारत'शी बोलताना मांडली.

भाजपचे जळगाव जिल्हाध्यक्ष उदय वाघ

By

Published : Apr 12, 2019, 10:23 AM IST

जळगाव - भाजपचे अमळनेरचे माजी आमदार डॉ. बी. एस. पाटील यांना गुरुवारी अमळनेरात युतीच्या मेळाव्यात मारहाण झाली होती. या घटनेचे भाजपचे जळगाव जिल्हाध्यक्ष उदय वाघ यांनी समर्थन केले आहे. या वादानंतर वाघ दाम्पत्याने आपली भूमिका 'ई- टीव्ही भारत'शी बोलताना मांडली.

डॉ. बी. एस. पाटलांना झालेल्या मारहाणीनंतर वाघ दाम्पत्याने आपली भूमिका 'ई- टीव्ही भारत'शी बोलताना मांडली

डॉ. बी. एस. पाटील यांनी आपली पत्नी तसेच विधानपरिषदेच्या आमदार स्मिता वाघ यांच्यावर पारोळ्यातील सभेत अश्लील भाषेत जाहीर टीका केली होती. आपल्यावर टीका केली असती तर ते सहन केले असते. मात्र, आपल्या पत्नीबाबत डॉ. पाटील यांनी केलेले वक्तव्य अक्षम्य होते. यामुळे या टीकेला आपण योग्य प्रत्युत्तर दिले असल्याचे उदय वाघ म्हणाले. त्याचप्रमाणे, डॉ. बी. एस. पाटील यांनी माझ्यावर अतिशय खालच्या पातळीवर टीका केली होती. त्यामुळेच कार्यकर्त्यांमध्ये तीव्र प्रक्षोभ होता. त्याचेच पडसाद मेळाव्यात उमटले असल्याचे त्यांनी सांगितले.

भाजपमध्ये काम करत असताना महिलांचा सन्मान करण्याची शिकवण दिली जाते. मी स्वतः महिलांवर होणाऱ्या अन्यायाला वाचा फोडण्याचे काम केले आहे. मी स्वतः अन्याय सहन करणार नाही आणि दुसऱ्या महिलेवर अन्याय होऊ देणार नाही, अशी प्रतिक्रिया आमदार स्मिता वाघ यांनी दिली. दरम्यान, आपण भाजपच्या पक्षसंघटनेत वाढलो आहोत. पक्षाच्या वाढीसाठी आपण यापुढेही कार्यरत राहू, असेही वाघ दाम्पत्य यावेळी म्हणाले.

ABOUT THE AUTHOR

...view details