महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

चाळीसगाव-धुळे मार्गावर भरधाव ट्रकची दुचाकीला धडक, पिता-पुत्राचा मृत्यू

भरधाव ट्रकने दुचाकीला धडक दिल्याने दुचाकीस्वार पिता-पूत्र जागीच ठार झाल्याची घटना घडली आहे. हा भीषण अपघात चाळीसगाव-धुळे रस्त्यावर भोरस फाट्याजवळ घडला. सतीश राठोड व राकेश राठोड अशी मृत व्यक्तींची नावे आहेत. ते चाळीसगाव तालुक्यातील इच्छापूर कारगावचे रहिवासी होते.

truck-bike accident
ट्रक -दुचाकीच्या अपघातात पित्र-पुत्राचा मृत्यू

By

Published : Oct 26, 2020, 8:13 PM IST

जळगाव -भरधाव ट्रकने दुचाकीला धडक दिल्याने दुचाकीस्वार पिता-पूत्र जागीच ठार झाल्याची घटना घडली आहे. हा भीषण अपघात चाळीसगाव-धुळे रस्त्यावर भोरस फाट्याजवळ घडला. सतीश राठोड व राकेश राठोड अशी मृत व्यक्तींची नावे आहेत. ते चाळीसगाव तालुक्यातील इच्छापूर कारगावचे रहिवासी होते.

हे पिता-पूत्र दुचाकीवरून आपल्या शेताकडे निघाले असतांना ही दुर्दैवी घटना घडली. सतीश राठोड व त्यांचा मुलगा राकेश राठोड हे दोघे दुचाकीवरून शेताकडे निघाले होते. यावेळी भोरस फाट्याजवळ त्यांच्या दुचाकीला ट्रकने धडक दिली. या अपघातात दोघेही ट्रकच्या चाकाखाली आल्याने दोघांचा जागीच मृत्यू झाला. या अपघातानंतर ट्रक चालक घटनास्थळावरून फरार झाला. याप्रकरणी मृत सतीश राठोड यांचे भाऊ गोकूळ राठोड यांनी दिलेल्या तक्रारीवरून, चाळीसगाव ग्रामीण पोलीस ठाण्यात ट्रक चालकाविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

दसऱ्याच्या दिवशीच पिता-पुत्रावर शोकाकूल वातावरणात अंत्यसंस्कार

या अपघाताची माहिती मिळताच भाेरस व करगाव परिसरातील नागरिकांनी घटनास्थळी धाव घेतली. दसऱ्याच्या आदल्या रात्रीच काळाने पिता-पुत्रावर घाला घातल्याने करगावात शोककळा पसरली. दसऱ्याच्या दिवशीच पिता-पुत्रावर शोकाकूल वातावरणात अंत्यसंस्कार करण्यात आले. अपघाताच्या वृत्तामुळे गावात सण साजरा झाला नाही. सतीश राठोड यांच्या पश्चात पत्नी आणि एक मुलगा असा परिवार आहे.

ABOUT THE AUTHOR

...view details