महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

जेडीसीसी बँकेच्या चाळीसगाव शाखेत दरोड्याचा प्रयत्न, तिजोरी न फुटल्याने रोकड वाचली - JDCC bank

ही घटना भरवस्तीत घडली आहे. त्यामुळे नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. चोरट्यांनी बँकेच्या मुख्य शटरचे कुलूप तोडून चोरीचा प्रयत्न केला. यावरून चोरट्यांची हिंमत किती वाढली आहे, याचा प्रत्यय येतो.

जेडीसीसी बँक

By

Published : Jul 16, 2019, 9:59 AM IST

Updated : Jul 16, 2019, 12:09 PM IST

जळगाव -जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या चाळीसगाव शाखेत सोमवारी मध्यरात्रीच्या सुमारास दरोड्याचा प्रयत्न झाला. ही घटना मंगळवारी सकाळी 6 वाजताच्या सुमारास उजेडात आली. सुदैवाने बँकेतील तिजोरी न फुटल्याने रोकड वाचली आहे.

जेडीसीसी बँकेच्या चाळीसगाव शाखेत दरोड्याचा प्रयत्न

चाळीसगाव शहरातील हिरापूर रस्त्यावर जळगाव जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेची शाखा आहे. सोमवारी मध्यरात्रीनंतर या शाखेत दरोड्याचा प्रयत्न झाला. चोरट्यांनी बँकेच्या मुख्य शटरचे कुलूप तोडून आत प्रवेश केला. त्यानंतर चोरट्यांनी बँकेतील अवजड तिजोरी उचलून बाहेर आणली. परंतु, चोरट्यांकडून तिजोरी फुटली नाही. त्यामुळे रोकड वाचली. चोरीचा प्रयत्न फसल्याने चोरट्यांनी बँकेपासून काही अंतरावर तिजोरी फेकून देत पळ काढला. हा प्रकार मंगळवारी सकाळी मॉर्निंग वॉकसाठी घराबाहेर पडलेल्या नागरिकांच्या लक्षात आला. यानंतर काही नागरिकांनी बँकेत दरोड्याचा प्रयत्न झाल्याचे पोलिसांना कळवले. त्यानंतर बँकेच्या अधिकाऱ्यांनादेखील या घटनेची माहिती देण्यात आली. बँकेचे अधिकारी आणि पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. यावेळी, बँकेत दरोड्याचा प्रयत्न झाला असून सुदैवाने तिजोरी न फुटल्याने रोकड सुरक्षित आहे. परंतु, पोलिसांच्या अकार्यक्षमतेमुळे हा प्रकार घडला आहे, अशी प्रतिक्रिया बँकेचे व्यवस्थापकीय संचालक जितेंद्र देशमुख यांनी 'ई टीव्ही भारत'शी बोलताना दिली.

ही घटना भरवस्तीत घडली आहे. त्यामुळे नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. चोरट्यांनी बँकेच्या मुख्य शटरचे कुलूप तोडून चोरीचा प्रयत्न केला. यावरून चोरट्यांची हिंमत किती वाढली आहे, याचा प्रत्यय येतो. शहरात पोलिसांची रात्रीची गस्त नावालाच असल्याने नागरिक संतप्त प्रतिक्रिया देत आहेत. जिल्हाभरात चोरीच्या घटना वाढल्या असून चोरट्यांनी एकप्रकारे पोलिसांना खुले आव्हानच दिले आहे.

Last Updated : Jul 16, 2019, 12:09 PM IST

ABOUT THE AUTHOR

...view details