जळगाव -जिल्ह्यात कोरोना कहर सुरूच आहे. दिवसेंदिवस परिस्थिती गंभीर होत चालली आहे. सद्यस्थितीत जिल्ह्यातील कोरोना पॉझिटिव्ह रुग्णांची संख्या त्रिशतकाच्या उंबरठ्यावर पोहचली असून, त्यामुळे आरोग्य यंत्रणेची डोकेदुखी वाढली आहे. सोमवारी सकाळी 13 पॉझिटिव्ह रुग्ण आढळल्यानंतर सायंकाळी जिल्हा प्रशासनाला दुसऱ्या टप्प्यात पुन्हा 18 पॉझिटिव्ह रुग्ण आढळल्याने एकच खळबळ उडाली आहे. जिल्ह्यातील कोरोना पॉझिटिव्ह रुग्णांची संख्या 297 इतकी झाली आहे.
जळगाव जिल्ह्यात कोरोना पॉझिटिव्ह रुग्णांची संख्या त्रिशतकाच्या उंबरठ्यावर - जळगाव कोरोना अपडेट
जिल्ह्यात आतापर्यंत कोरोनाबाधित रुग्णांची संख्या 297 इतकी झाली असून, त्यापैकी 77 व्यक्ती कोरोनामुक्त होऊन घरी गेल्या आहेत. तर 33 कोरोनाबाधित रुग्णांचा मृत्यू झाला आहे, अशी माहिती जिल्हा प्रशासनाच्या वतीने देण्यात आली आहे.
जिल्ह्यातील विविध ठिकाणी स्वॅब घेतलेल्या 94 कोरोना संशयित व्यक्तींचे नमुना तपासणी अहवाल आज सायंकाळी प्राप्त झाले आहेत. यापैकी 76 व्यक्तींचे तपासणी अहवाल निगेटिव्ह आले असून 18 व्यक्तींचे तपासणी अहवाल पॉझिटिव्ह आले आहेत. पॉझिटिव्ह आढळलेल्या व्यक्तींमध्ये जळगाव शहरातील दक्षतानगर, शाहूनगर, आर. आर. हायस्कूल परिसर याठिकाणचे 11, भुसावळ शहरातील साईनगर येथील 3, भडगाव येथील एक, पाचोरा येथील एक तसेच यावल तालुक्यातील कोरपावली येथील 2 रुग्णांचा समावेश आहे.