जळगाव - पंतप्रधानांनी रविवारी लागू केलेल्या जनता कर्फ्यूचा फायदा उचलून चोरट्यांनी एमआयडीसीतील मोरया ग्लोबल लि. या कंपनीच्या कार्यालयाचे कुलुप तोडून चोरी केल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. यामध्ये १ लाख १८ हजार रुपये किंमतीचे चार संगणक, प्रिंटर व सीपीयू चोरीला गेले आहेत. पोलिसांनी पाच दिवसानंतर गुरुवारी हा गुन्हा उघड केला असून दोन आरोपींना अटक करण्यात आली आहे.
जनता कर्फ्यूचा गैरफायदा घेऊन कंपनीतून लांबवले संगणक, दोघांना अटक - जळगाव चोरी बातमी
पंतप्रधानांनी रविवारी जनता कर्फ्यूचे आवाहन केले होते. त्यामुळे शनिवारी रात्रीपासूनच एमआयडीसीतील सेक्टर नंबर डी. १०४ व डी.१०५ मध्ये असलेली मोरया ग्लोबल लि. कंपनी बंद करण्यात आली होती. २३ तारखेला कंपनी उघडली असता कार्यालयाचे कुलूप तुटलेले होते, तर संगणक, प्रिंटर्स, सीपीयू चोरी झाल्याचे समजले.
सागर देवचंद महाजन (१९,रा. रामेश्वर कॉलनी) व मनोज आधार सोनवणे (१९,रा.आसोदा रोड, के.सी. नगर, जळगाव), असे आरोपींची नावे आहेत. दरम्यान, पंतप्रधानांनी रविवारी जनता कर्फ्यूचे आवाहन केले होते. त्यामुळे शनिवारी रात्रीपासूनच एमआयडीसीतील सेक्टर नंबर डी. १०४ व डी.१०५ मध्ये असलेली मोरया ग्लोबल लि. कंपनी बंद करण्यात आली होती. २३ तारखेला कंपनी उघडली असता कार्यालयाचे कुलूप तुटलेले होते, तर संगणक, प्रिंटर्स, सीपीयू चोरी झाल्याचे समजले. त्यामुळे कंपनीतील पुरुषोत्तम बद्रीनाथ पाटील (४७, रा. सदगुरु नगर, अयोध्या नगर) यांनी दिलेल्या तक्रारीवरून एमआयडीसी पोलिसात गुन्हा दाखल झाला होता.
गुन्हा उघडकीस आणण्यासाठी पोलीस निरीक्षक रणजीत शिरसाठ यांनी गुन्हे शोध पथकातील सहायक पोलीस अमोल मोरे, अतुल वंजारी, आनंदसिंग पाटील, रामकृष्ण पाटील, विजय नेरकर, जितेंद्र राजपूत, गोविंदा पाटील, इम्रान सैय्य्द, असीम तडवी, सचिन पाटील व योगेश बारी यांना तपासाच्या सूचना दिल्या होत्या. पथकाने तपासाची चक्रे फिरवली असता ही चोरी सागर देवचंद महाजन व मनोज आधार सोनवणे या दोघांची केल्याचे उघड झाले. पथकाने गुरुवारी दोघांना त्यांच्या घरातून अटक केली असून त्यांच्याकडून चारही संगणक आणि इतर साहित्य जप्त करण्यात आले.