जळगाव - जिल्ह्यात तापमानाचा पारा ४५ अंशांवर गेला असून तापमान प्रचंड असल्याने नागरिकांना लॉकडाऊनमुळे घरात असल्यावरही उन्हाच्या झळा सोसाव्या लागत आहेत. सध्या ग्रामीण भागातील तालुक्यातील लॉकडाऊन शिथिल करण्यात आल्याने मोठ्या प्रमाणावर नागरिक घराबाहेर किराणा माल तसेच शेतकरी वर्ग खरिपाच्या तयारीला लागल्याने तालुक्याच्या ठिकाणी यावे लागते. यादरम्यान उन्हाचे चटके सहन करून आपापली कामे उरकावी लागत आहेत.
जळगावात पारा 45 अंशांवर, लॉकडाऊनसोबत 'मे हिट' च्या तडाख्याने नागरिक हैराण - may heat at peak
मे हिटमुळे उन्हाचे असह्य चटके नागरिकांना सहन करावे लागत आहेत. त्यातल्या त्यात चांगली आर्थिक स्थिती असलेले नागरिक कुलर, एसीचा आधार घेऊ शकत आहेत. मात्र, इतरांची स्थिती अधिक बिकट आहे.
ऊन जास्त प्रमाणात असल्याने अनेकांना मात्र घराबाहेर पडणे अवघड झाले आहे. अंगाची लाही लाही होणार ऊन असून अंगावरील कपडे देखील गरम होत असल्याने जिवाची लाही होतेय. वाढत्या तापमानामुळे सकाळपासून उन्हाचे चटके लागायला सुरवात होते.
सायंकाळी सहा वाजेपर्यंत उन्हाच्या झळा अतिशय तीव्र स्वरूपाच्या असल्यानं नागरिकांना यावेळी घराबाहेर पडणे देखील मुश्किल होतेय. दुपारी उन्हामुळे रस्तेही ओस पडू लागलेय. मे हिटमुळे उन्हाचे असह्य चटके नागरिकांना सहन करावे लागत आहेत. त्यातल्या त्यात चांगली आर्थिक स्थिती असलेले नागरिक कुलर, एसीचा आधार घेऊ शकत आहेत. मात्र, इतरांची स्थिती अधिक बिकट आहे.