महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

जळगावात अल्पवयीन मुलीचा संशयास्पद मृत्यू; 2 दिवसांपूर्वी झाली होती बेपत्ता - जळगाव जिल्हा बातमी

कांचननगरमध्ये राहणाऱ्या एका अल्पवयीन मुलीचा मृतदेह सोमवारी सकाळी 9 वाजण्याच्या सुमारास आसोदा रेल्वेगेट परिसरात रेल्वेरुळालगत आढळून आला. ही मुलगी 15 फेब्रुवारीला पहाटे 4 वाजता घरातून बेपत्ता झाली होती. सकाळी 5 वाजण्याच्या सुमारास तिचे कुटुंबीय झोपेतून उठल्यानंतर त्यांना मुलगी घरात आढळून आली नाही.

Jalgaon
जळगावात अल्पवयीन मुलीचा संशयास्पद मृत्यू

By

Published : Feb 17, 2020, 8:02 PM IST

जळगाव- शहरातील कांचननगरमध्ये राहणाऱ्या एका अल्पवयीन मुलीचा मृतदेह सोमवारी सकाळी 9 वाजण्याच्या सुमारास आसोदा रेल्वेगेट परिसरात रेल्वेरुळालगत आढळून आला. दोन्ही पाय, उजवा हात फ्रॅक्चर तसेच शरीरावर जखमा असलेल्या अवस्थेत तिचा मृतदेह आढळला आहे. ही मुलगी 15 फेब्रुवारी रोजी पहाटे 4 वाजल्यापासून बेपत्ता होती.

या प्रकरणी शनिपेठ पोलीस ठाण्यात अपहरणाचा गुन्हा देखील दाखल आहे. या घटनेमुळे परिसरात खळबळ उडाली आहे. हे प्रकरण संशयास्पद असून चौकशी सुरू असल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे.

अल्पवयीन मुलीचा संशयास्पद मृत्यू

15 फेब्रुवारीला पहाटे 4 वाजता ही मुलगी घरातून बेपत्ता झाली होती. सकाळी 5 वाजण्याच्या सुमारास तिचे कुटुंबीय झोपेतून उठल्यानंतर त्यांना मुलगी घरात आढळून आली नाही. यानंतर वडिलांनी तिचा शोध सुरू केला. दिवसभर शोध घेऊनही ती मिळून आली नाही. त्यानंतर तिच्या वडिलांनी दिलेल्या तक्रारीवरून त्या दिवशी रात्री 10.58 वाजता शनिपेठ पोलीस ठाण्यात अपहरणाचा गुन्हा दाखल करण्यात आला होता.

गुन्हा दाखल झाल्यानंतर पोलिसांसह मुलीचे कुटुंबीय तिचा शोध घेत होते. सोमवारी सकाळी 8.45 वाजता आसोदा रेल्वेगेटचे गँगमन सिनकलाल दुबे यांना रेल्वेरुळालगत असलेल्या झुडूपात एक मृतदेह आढळला. जवळ जाऊन पाहिले असता बेपत्ता मुलीचा मृतदेह असल्याची खात्री पटल्यानंतर त्यांनी शनिपेठ पोलीस ठाण्यात माहिती दिली. पोलीस निरीक्षक विठ्ठल ससे यांच्यासह पथकाने घटनास्थळी जाऊन पंचनामा केला. या प्रकरणी शनिपेठ पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.

ABOUT THE AUTHOR

...view details