महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

'तेरी जीत मेरी जीत, तेरी हार मेरी हार...ऐसा है भाजप-सेना का प्यार' - सुधीर मुनगंटीवार - बांधिलकी आमदार हरिभाऊ जावळे

राज्याचे वित्त व वनमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी 'तेरी जीत मेरी जीत, तेरी हार मेरी हार...ऐसा भाजप-सेना का प्यार' अशा शब्दांत भाजप शिवसेनेत युती होणार असल्याचे अप्रत्यक्ष संकेत दिले आहेत.

सुधीर मुनगंटीवार

By

Published : Sep 17, 2019, 11:04 PM IST

Updated : Sep 18, 2019, 12:12 PM IST

जळगाव -आगामी विधानसभा निवडणुकीत भाजप आणि सेनेत युती होईल असा ठाम विश्वास राज्याचे वित्त व वनमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी आज जळगाव येथे व्यक्त केला केला आहे. 'तेरी जीत मेरी जीत, तेरी हार मेरी हार...अशा शब्दांत त्यांनी भाजप शिवसेनेतील युतीचे अप्रत्यक्ष संकेत दिले.

विधानसभा निवडणुकीत भाजप आणि सेनेत युती होईल, वित्त व वनमंत्री सुधीर मुनगंटीवार यांचा विश्वास

रावेर-यावल मतदारसंघाचे आमदार हरिभाऊ जावळे यांनी गेल्या ५ वर्षात केलेल्या विकासकामांचा आढावा घेणाऱ्या 'बांधिलकी' या पुस्तिकेचे प्रकाशन करण्यासाठी मुनगंटीवार जळगाव येथे आले होते. तसेच रावेर-यावल विधानसभा मतदारसंघातील सावदा येथे आयोजित बुथ कार्यकर्ता मेळाव्यालाही त्यांनी हजेरी लावली. यावेळी पत्रकारांनी युतीबाबत प्रश्न विचारला असता त्यांनी आपले मत मांडले.

हेही वाचा... माझा मुख्यमंत्र्यांवर विश्वास, लवकरच भाजपवासी होणार - नारायण राणे

युती होणार म्हणजे होणारच... मुनगंटीवार

विधानसभा निवडणुकीत भाजप-सेनेत युती होणार म्हणजे होणारच. आमचे प्रेम 'तेरी जीत मेरी जीत, तेरी हार मेरी हार.. ऐसा भाजप-सेना का प्यार' असे आहे. या माध्यमातून मला पूर्ण विश्वास आहे की युती होणारच. १९८९ मध्ये आमच्या युतीला सुरुवात झाली. २०१४ चा एक अपवाद वगळता ती कायम आहे. युतीच्या माध्यमातून आमचे विचारांचे प्रेम राज्यातील जनतेने पाहिले आहे. हेच प्रेम २०१९ च्या विधानसभा निवडणुकीत देखील युतीच्या माध्यमातून कायम असेल, असे त्यांनी सांगितले.

हेही वाचा... काँग्रेस-राष्ट्रवादीच्या ४० जागाही निवडूण येणार नाहीत - गिरीश महाजन​​​​​​​

ऑटोमोबाईल सेक्टरमधील मंदीवर मात करू - मुनगंटीवार

ऑटोमोबाईल सेक्‍टरमध्ये जागतिक स्तरावर मंदी आहे. ऑटोमोबाईल सेक्टरमधील मंदीवर मात करण्यासाठी आपला देश प्रयत्न करत आहे. २० तारखेला जीएसटी कौन्सिलमध्ये ऑटोमोबाईल सेक्टरमधील मंदीचा सामना करण्यासह त्यावर मात करण्यासाठी काय उपाययोजना करता येतील? यादृष्टीने विचार केला जाणार आहे, असेही यावेळी सुधीर मुनगंटीवार म्हणाले.

हेही वाचा... दारू तस्करी प्रकरणी राष्ट्रवादीच्या नगरसेवकाला अटक; 15 लाखांचा मुद्देमाल जप्त

Last Updated : Sep 18, 2019, 12:12 PM IST

ABOUT THE AUTHOR

...view details