महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

जळगावात मोकाट कुत्रे उठले जीवावर; जीव जाईपर्यंत तोडले आठ महिन्यांच्या बालकाचे लचके - stray dogs jalgaon latest news

जळगावात मोकाट कुत्रे शहरवासियांच्या जीवावर उठले आहे. एका आठ महिन्याच्या बालकावर मोकाट कुत्र्यांनी हल्ला चढविल्याने त्याचा जागीच मृत्यू झाला आहे. मृत मनीषचे कुटुंबीय परप्रांतीय असून ते उदरनिर्वाहासाठी जळगावात आलेले आहेत.

hut where Manish's family li
मनीषचा परिवार राहत असलेली झोपडी.

By

Published : Sep 11, 2020, 8:01 PM IST

Updated : Sep 11, 2020, 8:34 PM IST

जळगाव -शहरात माेकाट कुत्रे नागरिकांच्या जीवावर उठले आहेत. अंगणात असलेल्या एका बालकावर माेकाट कुत्र्यांनी हल्ला चढवल्याने त्याचा जागीच मृत्यू झाला. ही धक्कादायक घटना जळगावातील आसाेदा रेल्वेगेटजवळ असलेल्या वस्तीत घडली आहे. मनीष नाको मोरिया (वय - ८ महिने) असे मृत बालकाचे नाव आहे. मनीषचे कुटुंबीय परप्रांतीय असून ते उदरनिर्वाहासाठी जळगावात आलेले आहेत.

जळगावात मोकाट कुत्रे उठले जीवावर; आठ महिन्यांच्या बालकाचा जीव जाईपर्यंत तोडले लचके

जळगाव-भुसावळ दरम्यान तिसऱ्या आणि चाैथ्या रेल्वेलाइनचे काम सुरू आहे. आसाेदा रेल्वे गेटजवळून हाकेच्या अंतरावर रेल्वेचे काम करण्यासाठी ठेकेदारामार्फत काही मजूर मध्यप्रदेशातून जळगावात आले आहेत. रेल्वेलाइनला लागूनच ५ ते ६ कुटुंबांनी आपल्या झाेपड्या बांधल्या आहेत. यात मध्य प्रदेशातील झाबुआ जिल्ह्यातील नाकाे माना माेरिया (वय २६) या तरुणाचे कुटुंबही वास्तव्यास आहे. सर्व मजूर आपापल्या झाेपड्यांमध्ये बसून हाेते. दरम्यान, नाकाे माेरिया याची पत्नी काही अंतरावर असलेल्या दुकानावर किराणा आणि मुलांना खाऊ घेण्यासाठी जात हाेती. याचवेळी त्यांच्या आठ महिन्यांचा मुलगा मनीष याच्यावर माेकाट कुत्र्यांनी हल्ला केला. यात बाळाचे ताेंड, डाेळे, मान आणि पाेटाचे कुत्र्यांनी लचके ताेडले. त्यामुळे त्याचा जागीच मृत्यू झाला. रक्ताच्या थाराेळ्यात पडलेल्या पाेटाच्या गाेळ्याला पाहून आईने अक्षरश: हंबरडा फाेडला.

मृत मनीष मोरियाचे आईवडील.

महापालिकेच्या माध्यमातून गेल्या वर्षी नाेव्हेंबर महिन्यात सुरू झालेल्या कुत्रे निर्बिजीकरणाचा ठेका तक्रारींमध्ये तथ्य आढळल्याने बंद करण्यात आला आहे. त्यामुळे शहरातील माेकाट कुत्र्यांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे. रात्रीच्या अंधारात केव्हा कुठून कुत्रा अंगावर येईल, याची भीती वाहनधारकांना आणि पादचाऱ्यांना सतावत असते. तसेच अनेक चौकांमध्ये मोकाट कुत्र्यांच्या झुंडीच्या झुंडी बसलेल्या असतात. त्यामुळे येथून जाताना नागरिकांमध्ये प्रचंड भिती असते. यापूर्वीदेखील अनेकदा माेकाट कुत्र्यांनी लहान मुलांचे लचके ताेडल्याच्या घटना घडल्या आहेत. मात्र, आता थेट जीव गमवावा लागल्याची घटना घडल्याने संताप व्यक्त हाेत आहे.

Last Updated : Sep 11, 2020, 8:34 PM IST

ABOUT THE AUTHOR

...view details