महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

जळगावामध्ये राज्यस्तरीय रिदमिक जिम्नॅस्टिक स्पर्धेला सुरुवात; राज्यभरातील 250 स्पर्धक सहभागी - News about the sports universe

जळगावमध्ये महाराष्ट्र हौशी जिम्नॅस्टिक संघटना आणि हौशी जिम्नॅस्टिक असोसिएशन यांच्या वतीने ३० व्या रिदमिक जिम्नॅस्टिक राज्य अजिंक्यपद स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. या स्पर्धेत २५० स्पर्धक सहभागी झाले आहेत.

state-level-rhythmic-gymnastics-competition-began-in-jalgaon
जळगावामध्ये राज्यस्तरीय रिदमिक जिम्नॅस्टिक स्पर्धा

By

Published : Dec 13, 2019, 4:15 PM IST

Updated : Dec 13, 2019, 11:56 PM IST

जळगाव -महाराष्ट्र हौशी जिम्नॅस्टिक संघटना आणि जळगाव हौशी जिम्नॅस्टिक असोसिएशन यांच्या संयुक्त विद्यमाने 30 व्या रिदमिक जिम्नॅस्टिक राज्य अजिंक्यपद स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. 13 ते 15 डिसेंबर या कालावधीत जळगाव शहरातील छत्रपती शिवाजी महाराज जिल्हा क्रीडा संकुलात ही स्पर्धा पार पडणार आहे. शुक्रवारी दुपारी मान्यवरांच्या उपस्थितीत स्पर्धेचे उद्घाटन झाले.

जळगावामध्ये राज्यस्तरीय रिदमिक जिम्नॅस्टिक स्पर्धा

हेही वाचा -जळगाव जिल्ह्यातील २१ हजार शेतकरी पंतप्रधान कृषी सन्मान योजनेच्या लाभापासून वंचित

रिदमिक जिम्नॅस्टिक या क्रीडा प्रकाराला आंतरराष्ट्रीय ऑलिंपिक संघटनेची मान्यता असून हा क्रीडा प्रकार जगभरात लोकप्रिय आहे. रिदमिक जिम्नॅस्टिक हा मुलींसाठीचा एकमेव जिम्नॅस्टिक क्रीडा प्रकार आहे. ग्रामीण भागातील खेळाडूंना देखील या क्रीडा प्रकाराची गोडी लागावी, ग्रामीण भागातून आंतरराष्ट्रीय दर्जाचे जिम्नॅस्टिक खेळाडू तयार व्हावेत, या उद्देशाने महाराष्ट्र हौशी जिम्नॅस्टिक संघटनेच्या सहकार्याने जळगाव हौशी जिम्नॅस्टिक असोसिएशनच्या वतीने रिदमिक जिम्नॅस्टिक राज्य अजिंक्यपद स्पर्धेचे आयोजन करण्यात येते. यापूर्वी दोन वेळा जळगावमध्ये ही स्पर्धा पार पडली आहे. आता तिसऱ्यांदा स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे.

हेही वाचा -गोपीनाथ मुंडेंच्या जयंतीनिमित्त जळगावात भव्य शोभायात्रा

7 ते 20 वयोगटातील सुमारे 250 स्पर्धक खेळाडू या स्पर्धेत सहभागी झाले आहेत. मुंबई, पुणे, अहमदनगर, नागपूर, नाशिक, औरंगाबाद, अमरावती, यवतमाळ अशा विविध जिल्ह्यातील स्पर्धकांचा या स्पर्धेत समावेश आहे. ही स्पर्धा सब ज्युनिअर, ज्युनिअर, सिनियर, आणि ग्रुप अशा 4 गटात होत आहे. स्पर्धकांच्या सादरीकरणाचे परीक्षण करण्यासाठी आंतरराष्ट्रीय पातळीवरील पंच बोलावण्यात आले आहेत. या स्पर्धेत प्रावीण्य मिळवणाऱ्या स्पर्धकांची निवड राष्ट्रीय जिम्नॅस्टिक अजिंक्यपद स्पर्धेसाठी होणार आहे.

Last Updated : Dec 13, 2019, 11:56 PM IST

ABOUT THE AUTHOR

...view details