जळगाव - जिल्ह्यात कोरोनाचा संसर्ग अतिशय वेगाने फैलावत आहे. सोमवारी पुन्हा ८३ नवीन पॉझिटिव्ह रुग्ण आढळून आले आहेत. त्यामुळे आता जिल्ह्यातील कोरोनाबाधितांची एकूण संख्या आता २ हजार ४८३ इतकी झाली आहे. धक्कादायक बाब म्हणजे, सोमवारी एकाच दिवशी जिल्ह्यातील ७ कोरोनाबाधित रुग्णांचा मृत्यू झाला आहे. जिल्हा प्रशासनाला सोमवारी रात्री प्राप्त झालेल्या अहवालांमध्ये ८३ नवे पॉझिटिव्ह रुग्ण आढळले आहेत. त्यात जळगाव शहर २०, जळगाव ग्रामीण ४, अमळनेर ३, चोपडा १, भडगाव १, धरणगाव ७, जामनेर १५, रावेर १०, बोदवड २० आणि इतर २ रुग्णांचा समावेश आहे.
जळगाव जिल्ह्यात एकाच दिवशी ७ कोरोनाबाधित रुग्णांचा मृत्यू; सोमवारी ८३ नवे पॉझिटिव्ह - corona patient died in jalgaon
जळगाव जिल्ह्यात आतापर्यंत १७६ रुग्णांचा कोरोनामुळे बळी गेला आहे. सोमवारी तब्बल ७ कोरोनाबाधित रुग्णांचा मृत्यू झाला आहे. त्यात जळगाव शहरातील ३ रुग्ण, रावेर, धरणगाव, पाचोरा व चोपडा तालुक्यातील प्रत्येकी एका रुग्णाचा समावेश आहे.
विशेष म्हणजे, सोमवारी जळगाव शहर व बोदवड तालुक्यात प्रत्येकी २० रुग्ण आढळून आले आहेत. जिल्ह्यात सर्वाधिक ४६४ कोरोनाबाधित रुग्ण एकट्या जळगाव शहरात आहेत. त्या खालोखाल ३६६ रुग्ण भुसावळ शहरात आहेत. आतापर्यंत जिल्ह्यातील १४६३ रुग्ण कोरोनातून बरे झाले आहेत. त्यांना रुग्णालयातून डिस्चार्ज मिळाला आहे. सद्यस्थितीत ७५४ रुग्णांवर उपचार सुरू आहेत. त्यातील ९९ रुग्णांची प्रकृती चिंताजनक आहे.
सोमवारी ७ जणांचा मृत्यू -
जळगाव जिल्ह्यात आतापर्यंत १७६ रुग्णांचा कोरोनामुळे बळी गेला आहे. सोमवारी तब्बल ७ कोरोनाबाधित रुग्णांचा मृत्यू झाला आहे. त्यात जळगाव शहरातील ३ रुग्ण, रावेर, धरणगाव, पाचोरा व चोपडा तालुक्यातील प्रत्येकी एका रुग्णाचा समावेश आहे. जळगाव जिल्ह्यात एकीकडे कोरोना पॉझिटिव्ह रुग्णांची संख्या वाढत असताना दुसरीकडे कोरोनामुळे होणारे मृत्यूही वाढत असल्याने चिंतेची बाब कायम आहे. आरोग्य यंत्रणेकडून होणाऱ्या उपाययोजना कामी येत नसल्याची स्थिती आहे.
कोरोना अपडेट -
जळगाव शहर ४६४
जळगाव ग्रामीण ७६
भुसावळ ३६६
अमळनेर २६४
चोपडा १९४
पाचोरा ५४
भडगाव ११३
धरणगाव ११२
यावल ११३
एरंडोल ७७
जामनेर १२३
रावेर १८२
पारोळा १६७
चाळीसगाव २६
मुक्ताईनगर १७
बोदवड ३६
एकूण २४८३