महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

तुझ्यात जीव रंगला.! जळगावच्या उत्तर महाराष्ट्र विद्यापीठातील प्राध्यापकाचे प्रेम प्रकरण चव्हाट्यावर - पीएचडी

गुरू आणि शिष्यामधील नाते कसे असायला हवे, हेच भटकरांना कळले नाही. शिक्षण क्षेत्राला काळिमा फासणाऱ्या या प्रकरणाची विद्यापीठ प्रशासनाला तातडीने दखल घ्यावी लागली. कुलगुरूंनी या प्रकरणाच्या चौकशीसाठी समिती नेमली आहे. समितीच्या अहवालानंतर डॉ. भटकर यांच्यावर कारवाई केली जाणार असल्याचे विद्यापीठ प्रशासनाने स्पष्ट केले आहे.

कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठ जळगाव

By

Published : Jul 11, 2019, 12:27 PM IST

Updated : Jul 11, 2019, 12:42 PM IST

जळगाव - कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठ सध्या एका प्राध्यापकाच्या एकतर्फी प्रेम प्रकरणामुळे चांगलेच चर्चेत आले आहे. आपले एकतर्फी प्रेमप्रकरण दडपण्यासाठी या प्राध्यापकाने काही विद्यार्थिनींना गुणांची खैरात वाटून आपल्यावर अन्याय केल्याची तक्रार एका विद्यार्थ्याने कुलगुरुंकडे केली होती. त्याच्या या तक्रारीनंतर आता वर्षभरापूर्वी दडपलेल्या प्रकरणाचे बिंग फुटले आहे.

'तुझ्यात जीव रंगला'; जळगावच्या उत्तर महाराष्ट्र विद्यापीठातील प्राध्यापकाचे प्रेमप्रकरण चव्हाट्यावर !

विद्यापीठातील जनसंवाद आणि पत्रकारिता विभागात मागील वर्षी हा सारा प्रकार घडला. विभागाचे प्रमुख प्रा. डॉ. सुधीर भटकर यांनी हा प्रताप करत गुरू-शिष्याच्या नात्याला काळिमा फासली आहे. काही महिन्यांपूर्वी प्रा. भटकर यांच्या विभागात शिकणाऱ्या एका विद्यार्थिनीवर एकतर्फी प्रेम जडले. वयाची पन्नाशी गाठलेल्या भटकर यांनी ज्या विद्यार्थिनीवर त्यांचे एकतर्फी प्रेम जडले होते, तिच्या मैत्रिणीजवळ आपल्या प्रेमभावना कथन केल्या. भटकर यांच्या प्रेमभावना त्या संबंधित विद्यार्थिनीने आपल्या मोबाईलमध्ये कैद करून घेतल्या.

त्यानंतर भटकर यांचे एकतर्फी प्रेमप्रकरण अनेक महिने चालत राहिले. त्यांचे वागणे गुरू-शिष्याच्या नात्याला शोभणारे नसल्याने संबंधित विद्यार्थिनींनी एक दिवस भटकर यांच्या दालनात जाऊन याबाबत त्यांना जाब विचारला होता. यावेळी बराच राडा झाला होता. नंतर आपली चूक झाल्याचे कबूल करत भटकर यांनी त्या विद्यार्थिनींचे गुण वाढवून देत या प्रकरणावर पडदा टाकला होता.

....असे बाहेर आले प्रकरण -

हे प्रकरण शांत झाले होते. मात्र, शैक्षणिक सत्राचा निकाल लागल्यानंतर ज्यांनी मनापासून उत्तम अभ्यास करून आपण गुणवत्तेत येऊ, अशी अपेक्षा बाळगली होती; त्यांची निराशाच झाली. अशाच विद्यार्थ्यांपैकी एक असलेला आशिष सोनवणे नामक विद्यार्थी या प्रकरणाच्या मुळापर्यंत गेला. त्याने भटकर यांच्या एकतर्फी प्रेमप्रकरणाची कुंडली बाहेर काढली. विद्यार्थिनी आणि भटकर यांच्यात झालेल्या संभाषणाची ऑडिओ क्लिप देखील आशिषने मिळवली. त्यानंतर या प्रकाराबाबत पुराव्यानिशी कुलगुरूंकडे लेखी तक्रार केली.

गुरू आणि शिष्यामधील नाते कसे असायला हवे, हेच भटकरांना कळले नाही. शिक्षण क्षेत्राला काळिमा फासणाऱ्या या प्रकरणाची विद्यापीठ प्रशासनाला तातडीने दखल घ्यावी लागली. कुलगुरूंनी या प्रकरणाच्या चौकशीसाठी समिती नेमली आहे. समितीच्या अहवालानंतर डॉ. भटकर यांच्यावर कारवाई केली जाणार असल्याचे विद्यापीठ प्रशासनाने स्पष्ट केले आहे.

काही वर्षांपूर्वी विद्यापीठाचे बोगस पीएचडी प्रकरण देशभर गाजले होते. त्यानंतर पेपरफुटी प्रकरण, विदेशी विद्यार्थिनीला वसतिगृहात बेकायदेशीर प्रवेश दिल्याचे प्रकरण, अशा अनेक प्रकरणांमुळे विद्यापीठाची बदनामी झाली होती. नेहमीच वादात असलेल्या कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठाचे नाव पुन्हा एकदा या नव्या प्रकरणामुळे बदनाम झाले आहे.

Last Updated : Jul 11, 2019, 12:42 PM IST

ABOUT THE AUTHOR

...view details